Dupatta Serial Killer Mahanand Naik  Dainik Gomantak
गोवा

Dupatta Killer Mahanand Naik: दुपट्टा किलर महानंद नाईक पुन्हा कोलवाळ तुरूंगात

फर्लो रजेचा कालावधी संपला

Akshay Nirmale

Dupatta Killer Mahanand Naik Furlogh Ends: राज्यात खळबळ उडवून देणारा महिलांचा कर्दनकाळ, दुपट्टा किलर महानंद नाईक याच्या फर्लो रजेचा 21 दिवसांचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे महानंद आज, बुधवारी पुन्हा कोलवाळ तुरूंगात दाखल झाला.

फर्लो रजा मंजुर केल्याने सुमारे 14 वर्षांनंतर महानंद तुरूंगाबाहेर आला होता. त्याच्यावर 16 महिलांच्या खुनाचे गुन्हे नोंद होते. त्यापैकी दोन प्रकरणांत त्याला जन्मठेपेची तर एका बलात्कार प्रकरणातही शिक्षा झाली आहे. फर्लो रजा काळातही त्याच्यावर पोलिस नजर ठेऊन होते.

महानंद हा गरीब महिलांना हेरून, त्यांना विवाहाचे आमिष दाखवून दागिने घेऊन येण्यास सांगत असे. तो दागिने घेऊन निर्जनस्थळी नेऊन दुपट्‍ट्याने महिलांचा गळा आवळून खून करत असे. फोंड्यातील एका महिलेने त्याच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर त्याच्या गुन्ह्यांची मालिका उघडकीस आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT