Goa Monsoon 2023: राज्यात सर्वत्र मुसळधार; 24 तासांत 100 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस, काणकोणमध्ये सर्वाधिक

पणजी तुडुंब, राजधानीत रस्ते पाण्याखाली; जनजीवन विस्कळीत, झाडे-घरांची पडझड
Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon 2023: गुजरात ते केरळच्या किनाऱ्यापर्यंत समुद्रसपाटीलगत निर्माण झालेला ऑफ-शोअर ट्रफ आणि बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळ सदृश स्थितीमुळे गोव्यासह पश्चिम किनारपट्टीला पावसाने जोरदार तडाखा दिला.

राज्यात गेल्या 24 तासांत सर्वत्र 100 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला असून सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहने गटारात गेल्याने वाहनचालकांसह पोलिसांची तारांबळ उडाली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि घरांच्या भिंती पडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Goa Monsoon 2023
Betul Woman Drowned: नाकेरी बेतुल येथे साळ नदीत बुडाली महिला

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गुजरात ते उत्तर केरळच्या किनाऱ्यापर्यंत समुद्रसपाटीजवळ ऑफ-शोअर ट्रफ तयार झाला आहे. त्यातच उत्तर आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत उत्तर आणि मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ स्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे राज्यातील वाऱ्याचा वेग ताशी 50 किलोमीटर झाला आहे. यामुळे पहाटेपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पावसाचे स्वरूप अतिवृष्टीसारखे आहे. पणजी शहरात मुख्य रस्त्यासह लगतच्या मळा, पाटो, सांतिनेज, ताळगाव, करंजाळे परिसरासह दिवजा सर्कल ते मिरामार रस्त्यावर पाणी साचले आहे.

अनेक वाहने गटारात

पणजीसह अनेक भागातील रस्त्यांवर पाणी भरले आहे. या पाण्यातून वाहन चालवणे अवघड बनले असून पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक ठिकाणी वाहने गटारात गेल्याचे निदर्शनास आले. यामुळे वाहनचालक आणि पोलिसांची तारांबळ उडाली आहे. मडगावातही काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

Goa Monsoon 2023
CM Pramod Sawant: स्पेशल ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या गोव्याच्या खेळाडुंना सरकारी नोकरीसह 5 लाख रूपये रोख बक्षीस

9 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 9 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज बुधवारी राज्यात ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला असून उद्या गुरुवारी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ असेल त्यानंतरही राज्यात मोठ्या पावसाची शक्यता आहे.

यादरम्यान समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे समुद्रात कोणी उतरू नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सर्वाधिक पाऊस काणकोणमध्ये

गेल्या 24 तासांत काणकोणमध्ये 170.2 मि.मी. असा सर्वाधिक पाऊस नोंदला गेला आहे. तर केपे येथे 140.6 मि.मी. पाऊस झाला आहे. याशिवाय सांगे येथे 104.5 मि.मी., मुरगाव येथे 104.6 मि.मी., मडगावात 122.6 मि.मी., दाबोळी येथे 104.6 मि.मी. तर पणजीत 119.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com