Bicholim Setu Sangam Dainik Gomantak
गोवा

Bicholim Setu Sangam: खून प्रकरणामुळे डिचोलीतील ‘सेतू संगम' प्रकल्पावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

देखभालीकडे सुरवातीपासूनच दुर्लक्ष : खून प्रकरणामुळे प्रकल्पावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दैनिक गोमन्तक

तुकाराम सावंत

Bicholim Setu Sangam: एका युवकाचा खून झाल्याने शहराच्या वैभवात भर घालणारा ‘सेतू संगम’ हा रिव्हर फ्रंट प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. खून प्रकरणामुळे या प्रकल्पस्थळी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पस्थळी आणखीन गुन्हेगारी घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था ठेवावी, अशी मागणी डिचोलीवासीयांकडून होत आहे.

सुरवातीपासूनच ‘श्रेय’वादात अडकलेल्या या प्रकल्पाची देखभाल करण्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याने या प्रकल्पाच्या सौंदर्याला सध्या अनेक समस्यांचे ग्रहण लागल्याचे आढळून येत आहे. सहा वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम आणि जलस्रोत खात्याच्या सहकार्यातून येथील दोन्ही पुलांच्या मधोमधच्या जागेत तत्कालीन आमदार नरेश सावळ यांच्या कार्यकाळात हा प्रकल्प साकारण्यात आला होता.

या प्रकल्पस्थळी नववर्ष स्वागत समारंभ, वाढदिवस आदी कार्यक्रमांचे आयोजन होत होते. मध्यंतरी या प्रकल्पस्थळी दिवाळी उत्सवही साजरा करण्यात येत होता. मात्र, हळूहळू या प्रकल्पाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, हा प्रकल्प अद्यापही पालिकेच्या ताब्यात दिला नसल्याच्या माहितीस नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्याकडूनही दुजोरा मिळाला आहे.

भिकाऱ्यांचे आश्रयस्थान

अलीकडच्या काळात ‘सेतू संगम’ हा प्रकल्प म्हणजे भिकाऱ्यांसाठी आश्रयस्थान बनले आहे. बऱ्याचदा रात्रीच्यावेळी या प्रकल्पात भिकारी आश्रय घेतात. काहीजण या प्रकल्पस्थळी मद्यप्राशन करून झोपलेले असतात, अशी माहिती मिळाली आहे.

प्रकल्पात दुर्गंधी

या प्रकल्पात सर्वत्र चारा आणि पावसाळी रोपे उगवलेली आहेत. त्यामुळे प्रकल्पस्थळी विदारक चित्र दिसून येत आहे. एका कोपऱ्यात तर ‘शौच’ विधी करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. सध्या या प्रकल्पात गेल्यास असह्य दुर्गंधीचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

रेस्टॉरंटमध्ये अचानक घुसला 'छोटा' पाहुणा, कर्मचाऱ्याने प्रेमाने दिला नाश्ता; हृदयस्पर्शी Video Viral

Goa Assembly Session: गोव्यात पर्यटक घटले! सरकारने आत्मचिंतन करावे- विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT