National Highway Dainik Gomantak
गोवा

National Highway: राष्ट्रीय महामार्ग-66 मुळे उगवेवासीयांवर संकट

रस्ता रुंदीकरण सुरू : सर्व्हिस रस्त्याचा पत्ता नाही

गोमन्तक डिजिटल टीम

National Highway राष्ट्रीय महामार्ग 66 च्या रुंदीकरणाचे काम सध्या तोरसे, उगवे, पोरस्कडे या तीन ठिकाणी युद्धपातळीवर सुरू आहे. उगवे परिसरातील या राष्ट्रीय महामार्गामुळे गावात येण्यासाठी किंवा जाण्यासाठी सर्व्हिस रस्ते अजूनपर्यंत केलेले नाहीत.

तसेच पर्यायी सोयही नसल्यामुळे भविष्यात गावावर मोठे संकट येणार आहे. त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या शेतात जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ओलांडतानाही पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी उगवेवासीयांनी केलेली आहे.

राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण करण्यापूर्वी उगवेवासीयांनी वेळोवेळी आपल्या गावातील समस्या सरकार दरबारी पोहोचविल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासमोरही उगवेवासीयांनी समस्या मांडल्या होत्या.

त्यावेळी पर्रीकर यांनी गावाच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गावात बैठक घेऊन उगवेवासीयांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर, संबंधित खात्याचे अधिकारी, मामलेदार, उपजिल्हाधिकारी उपस्थित होते.

त्यावेळीही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उगवेवासीयांच्या समस्या सोडविण्यासाठी पर्यायी सर्व्हिस रस्ते करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते आश्वासन आजपर्यंत पूर्ण केलेले नाही. राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करताना कंत्राटदार मनमानी करत आहे. त्यामुळे रस्ता ओलांडताना ग्रामस्थांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.

ठेकेदाराची मनमानी

राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या बऱ्याच जमिनी रस्ता परवानाधारक ठेकेदाराने विकासाच्या नावाखाली हडप केल्याचा दावा उगवेवासीयांनी केला. गावाच्या लोकांचे उपजीविकेचे साधन असणारी हजारो झाडे कुठल्याही शेतकऱ्यांना कल्पना न देता ठेकेदाराने अचानक बुलडोझरद्वारे भुईसपाट केली.

आमच्या गावासाठी आम्ही मागच्या पंधरा वर्षांपासून संघर्ष करत आहोत. संबंधित अधिकारी, मुख्यमंत्री, आमदारांनी प्राधान्यक्रमाने गावातील विकासकामे करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते आजपर्यंत पूर्ण झाले नाही. अभियंत्यांनीही आम्हाला विश्वासात न घेता आमची फसवणूक केलेली आहे. अशा स्थितीत आमच्या समस्या कोण मांडणार?

- शशिकांत महाले, माजी सरपंच

सात-आठ वर्षांपूर्वी या रस्त्यासाठी जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. ही जमीन संपादन प्रक्रिया करत असताना स्थानिकांना विश्वासात घेतले नाही.

त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होईल, याविषयी नुकतीच मंदिरात बैठक घेतली. आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गावात येऊन गावाची स्थिती पाहावी.

- विठू महाले, नागरिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT