Mapusa RTO : कळंगुट पंचायतीकडून २१ बेवारस वाहने जप्त

कळंगुट पंचायतीकडून २१ बेवारस वाहने जप्त
Mapusa RTO
Mapusa RTODainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : कळंगुट पंचायतीने वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने बेवारस वाहनांवर कारवाई करीत, मंगळवारी (ता.४) तब्बल २१ वाहने जप्त केली. सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी जप्त केलेल्या वाहनांची तसेच या मोहिमेची पाहणी केली. यावेळी कळंगुट वाहतूक पोलिस निरीक्षक सचिन नार्वेकर हे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत उपस्थित होते.

पंचायत क्षेत्रातील रस्त्यांवर महिनो न महिने धूळ खात पडून असणाऱ्या बेवारस वाहनांवर जप्तीची कारवाई कळंगुट पंचायतीने सुरू केली आहे. मंगळवारी पंचायतीने १५ दुचाकी व ६ चारचाकी वाहने जप्त केली.

Mapusa RTO
Vehicle Tires History: वाहनं अनेक चाकांचा रंग एकच! का असतो टायरचा रंग काळा? वाचा इतिहास

सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले की, गावाचे विद्रुपीकरण करणारे एकही वाहन रस्त्यावर आम्ही ठेवू देणार नाही. या बेवारस वाहनांमुळे वाहतुकीलाही अडथळे निर्माण व्हायचे. पंचायतीने वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने ‘नो पार्किंग’ व पदपथावर पार्क असणारी बेवारस वाहने जप्त केली. लोकांनी आपली वाहने अशी रस्त्यावर ठेवू नयेत. एक वाहन मागील तीन वर्षे असेच पडून होते. ते वाहनही जप्त केले आहे.

Mapusa RTO
45 लाख किमतीची वाहने वापराविना पडून | MMC vehicles worth 45 Lakhs stands unutilized | Gomantak TV

जप्त केलेल्या वाहनांच्या मालकांना नोटीस पाठवून दंड आकारला जाईल. आणि ज्या वाहनांचे मालक वाहने सोडविण्यासाठी पंचायतीकडे येणार नाहीत, अशा वाहनांची माहिती आरटीओला देऊन नियमांनुसार वर्तमानपत्रात जाहिरात देऊन त्या वाहनांचा लिलाव केला जाईल.

- जोसेफ सिक्वेरा, कळंगुट सरपंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com