Dry day in Goa on Valentines day for Assembly Elections 2022 netizens troll Election Commission Dainik Gomantak
गोवा

गोव्यात चाललंय काय? व्हँलेटाईनला ड्राय डे, निवडणूक आयोग ट्रोल

कुठे नेऊन ठेवलाय गोवा?14 फेब्रुवारीपासून गोवासियांना 3 दिवसांची सुट्टी, वोटिंगमुळे व्हॅलेंटाईन प्लॅन वेटिंगवर

Priyanka Deshmukh

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 10 मार्चला निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीची अधिसूचना 21 जानेवारीला जारी होणार आहे. 28 जानेवारीपर्यंत नावनोंदणी करता येईल, 29 जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 31 जानेवारीपर्यंत नावे मागे घेता येतील. निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार आहे.

सध्या जगभरातील तरुणांमध्ये व्हॅलेंटाईन डेचा (Valentine's day) उत्साह पाहायला मिळत आहे. साधारणपणे हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो, मात्र यावेळी गोव्यात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना निराशेचा सामना करावा लागू शकतो. गोव्यात 2022 च्या विधानसभा निवडणुकांमुळे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारीला मतदान (Voting) होणार आहे. गोव्यासह पाच राज्यांतील निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

गोव्यात 14 फेब्रुवारी 2022 रोजी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, ट्विटर वापरकर्ते गोवा निवडणुकीचा मुद्दा घेवून मजेदार ट्विट करत आहेत. एका वापरकर्त्याने "प्रेमीयुलांसाठी एक मिनिट मौन" म्हटले आहे. निवडणूक आयोगाने मतदानासाठी प्रेमाचा दिवस का निवडला हे सांगता येणार नाही मात्र, नेटिझन्सनी या विषयावर मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर ट्विट्स केले आहेत.

गोव्यातील 40 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले. गोव्यात यावेळी भारतीय जनता पक्षाशिवाय काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात लढत होणार आहे. गोव्यातील विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च 2022 रोजी संपणार आहे. निष्पक्ष निवडणुकांसाठी अवैध पैसा, दारू आणि ड्रग्जवर आळा घालण्यात येणार आहे या संदर्भात सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

गोव्यात व्हॅलेंटाईन डेला मतदान होणार असल्याने नेटकर्यांनी अनेक मिम्स सोशल मिडियावर शेअर केले आहेत तर काहींनी कमेंटही केल्या आहेत. 14 फेब्रुवारीला सोमवार येतो. आणि या दरम्यान गोवासियांना 3 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. शनिवार-रविवार-सोमवार असे तीन दिवस गोव्यात निवांत वातावरण असणार आहे. अशा परिस्थिती आशा आहे की गोवावासी मतदान करतील, अशा आशयाचे ट्विट एक युजर्सने केले आहे. आता गोव्यात मतदानाची धूम असणार की व्हॅलेंटाईन डेची हे बघणे औत्युक्याचे ठरणार आहे. कारण पर्यटक, प्रेमीयुगलांची व्हॅलेंटाईन डेला गोव्याकडे जास्त धाव असते. महिनाभराआधी प्लॅनिंगही तयार असते. मात्र यंदाच्या गोवा निवडणुकीमुळे प्रेमीयुगलांच्या प्लनवर पाणी फेरणार असेच दिसतेय.

गोव्यातील या जागांवर होणार मतदान

14 फेब्रुवारी 2022 रोजी गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मांद्रे, पेडणे, डिचोली, थिवी,म्हापसा, शिवोली, सालिगाव, कलंगुट, पर्वरी, कळंगुट, हळदोना, पणजी, ताळगाव, संटॅक्रुज, सेंट आंद्रे, कुंभार जुवा, मये, साखळी, पर्ये, वाळपळी, प्रियोळ, फोंडा, शिरोडा, मेरशे, मुरगाव, वास्को, दाभोळी, कुठाळी, नुवे, कुडतरी, फातोर्डा, मडगाव, बेनावली, कुक्कळी, वेळी, केपे, कुडचडे, सावर्डे, सांगे, काणकोण आणि नावेली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT