Drunken patient ruckus Asilo Hospital Dainik Gomantak
गोवा

शर्ट काढून वॉर्डची तोडफोड अन् अश्लील भाषेत शिवीगाळ, दारूच्या नशेत रुग्णाचा 'धुमाकूळ'; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Hospital Workplace Safety: उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये एका मद्यधुंद रुग्णाने घातलेल्या धिंगाण्यामुळे एकच खळबळ उडाली.

Sameer Amunekar

म्हापसा: उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये एका मद्यधुंद रुग्णाने घातलेल्या धिंगाण्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला असून, संतप्त डॉक्टरांनी आता रुग्णालयात कडक सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.

वॉर्डमध्ये तोडफोड आणि अश्लील भाषेत शिवीगाळ

समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्ण हा पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने स्वतःचा टी-शर्ट काढलेला होता आणि त्याच्या तोंडाभोवती जखमांच्या खुणा दिसत होत्या. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तो अचानक हिंसक झाला.

त्याने वॉर्डमधील वैद्यकीय वस्तूंची फेकाफेक केली, साहित्याची तोडफोड केली आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णालयातील इतर रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

सुरक्षारक्षकांविना डॉक्टर धोक्यात

ही धक्कादायक घटना घडली तेव्हा निवासी डॉक्टर कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये रुग्णांवर उपचार करत होते. सर्वात गंभीर बाब म्हणजे, यावेळी परिसरात एकही सुरक्षारक्षक हजर नव्हता.

रुग्णाने धुमाकूळ घातला असताना त्याला रोखण्यासाठी कोणाचीही मदत न मिळाल्याने डॉक्टरांना स्वतःचा जीव वाचवत परिस्थिती हाताळावी लागली. "रुग्णांची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे, पण त्यासाठी आम्हाला आमची सुरक्षा धोक्यात घालण्याची गरज पडू नये," अशा भावना उपस्थित डॉक्टरांनी व्यक्त केल्या आहेत.

सुरक्षा देण्याची मागणी

या घटनेनंतर डॉक्टरांच्या संघटनेने रुग्णालय प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णालयात २४ तास पुरेसा सुरक्षा ताफा तैनात करण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT