Goa Drunk Tourist Girl  Dainik Gomantak
गोवा

Viral Video: मद्यधुंद युवतीचा धिंगाणा; पणजीत रस्ता रोखला

तिच्याबरोबर असणारा तिचा मित्रही मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे

दैनिक गोमन्तक

Drunk Tourist Girl Creates Ruckus: राज्यात ‘ड्रंक ॲंड ड्राइव्ह’मुळे अपघात वाढत असतानाच पणजी शहरात रविवारी (ता.२०) एका मद्यधुंद युवतीने रस्त्याच्या मधोमध धिंगाणा घातला.

रविवारी रात्री घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमात काही मिनिटांत व्हायरल झाला आहे. पोलिस आता या प्रकरणाची दखल घेणार की नाही, याबाबत चर्चा होत आहे.

राजधानीतील भाऊसाहेब बांदोडकर मार्गाच्या बाजूला असणाऱ्या कॅसिनोंच्या कार्यालयांचा परिसर सध्या मद्यधुंद व्यक्तींकडून गोंधळ घालण्याच्या प्रकारामुळे चर्चेत येत आहे.

गेल्या काही महिन्यांत याठिकाणी मद्यधुंद युवक-युवतींकडून धिंगाणा घालण्याचे प्रकार घडलेले आहेत. मद्यधुंद तरुणीचा भर रस्त्यात धिंगाणा घालतानाचा एक व्हिडिओ असून, नुकताच सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ काही मिनिंटांमध्येच हजारांहून अधिकजणांनी पाहिला आहे. दरम्यान, अशा पर्यटकांमुळेच राज्याची बदनामी होत असून, असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून व्यक्त होत आहेत.

मित्रही नशेत

मद्याच्या नशेत असलेली तरुणी एका चारचाकी वाहनाला अडवून ती त्यातील व्यक्तींशी हुज्जत घालत असल्याचे आणि ते वाहन निघून जाताना ती त्या वाहनावर हाताने मारत असताना दिसत आहे.

तिच्याबरोबर असणारा तिचा मित्रही मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी ‘रेंट अ कॅब’ची कार घेतली होती.

वाहतूक कोंडी

मद्यधुंद युवतीने भर रस्त्यात घातलेल्या धिंगाण्यामुळे येथे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. ती तरुणी एवढ्या नशेत होती की स्वतःवर तिचे नियंत्रण राहिले नव्हते.

नशेमध्ये ती बडबड करीत होती आणि भररस्त्यात वाहनांना आडवी जात होती. अनेक वाहनधारकांना नेमके येथे काय चालले आहे, हे कळत नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सांकवाळ येथे फ्लॅट फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Weather Update: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर पावसाचं संकट; 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

SCROLL FOR NEXT