Calangute Drunken Youth Dainik Gomantak
गोवा

Calangute: मद्यधुंद पर्यटकाने कळंगुटमध्ये रस्त्यावर फोडल्या बीयरच्या बाटल्या; स्थानिकांनी 'अशी' घडवली अद्दल

स्थानिकांनी मद्यधुंद तरूणाची मस्ती जिरवली; व्हिडिओ व्हायरल

Akshay Nirmale

Calangute: गोव्यात नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करायला अजूनही पर्यटकांचा ओघ कायम आहे. यातील काही पर्यटक आपल्या बेशिस्त वर्तनातून बट्टा लावण्याचे काम करत असतात. अशाच एका पर्यटकाला कळंगुट येथील स्थानिक नागरीकांनी अद्दल घडवत चांगलीच समज दिली आहे.

गोव्यातील कळंगुट हा समुद्रकिनारा पर्यटकांच्या आकर्षणाचा नेहमीच केंद्रबिंदू राहिला आहे. गोव्यात येणारा पर्यटक कळंगुट बीचला नेहमीच पसंती देत आले आहेत. बुधवारी असाच एक पर्यटक कळंगुटमध्ये आला होता. त्याने मद्यसेवन केले होते. तथापि, त्याला तो जे काही करतोय ते सर्व समजत होते. पण त्याच्यातील मस्तीमुळे तो येथील नागरीकांच्या नजरेत आला.

दारूच्या नशेतच या पर्यटक तरूणाने बीयरच्या रिकाम्या बाटल्या येथील मुख्य रस्त्यात चक्क चौकातील रस्त्यावर फोडण्यास सुरवात केली. येथील नागरीकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्या तरूणाला हटकले व असे करण्यास मज्जाव केला. तरी देखील तो तरूण आपल्याच तंद्रीत बाटल्या फोडत राहिला. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरीकांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली.

नागरीकांनी या मद्यधुंद तरूणाला जाब विचारला आणि आपला खाक्या दाखवला. त्यावर या मद्यधुंद तरूणाला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यानंतर स्थानिक नागरीकांनी या तरूणाला त्याने फोडलेल्या बीयरच्या बाटल्यांच्या काचा रस्त्यातून उचलून साफ करण्यास सांगितले. मद्यधुंद तरूणाने निमुटपणे स्थानिकांचे ऐकत बाटल्यांच्या सर्व काचा उचलून एका पिशवित एकत्रित केल्या. तसेच बेशिस्त वर्तनाबद्दल स्थानिकांची हात जोडून माफी मागितली. स्थानिकांच्या या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT