Mopa: 'मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट' नावावर केंद्रीय मंत्रीमंडळाकडून शिक्कामोर्तब

विमानतळावर उद्यापासून विमान वाहतुकीला सुरवात
Mopa International Airport | Manohar Parrikar
Mopa International Airport | Manohar ParrikarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Mopa: गोव्यातील मोपा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव द्यायचे यावरून गोव्यात बराच गदारोळ झाला होता. अखेर 11 डिसेंबर रोजी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विमनतळाचे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट असे नामकरण करण्यात आले. दरम्यान, आता केंद्रीय मंत्रीमंडळानेही या नावावर बुधवारी 4 जानेवारी रोजी शिक्कामोर्तब केले.

Mopa International Airport | Manohar Parrikar
Mapusa: म्हापसा उपआरोग्य केंद्राची लवकरच सुधारणा होणार; वित्त आयोगाच्या निधीतून कामाचा खर्च

मोपा येथील विमानतळाला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी सुरवातीपासून होत होती. त्यानंतर गोव्याचे पहिले विरोधी पक्षनेते जॅक सीक्वेरा यांचे नाव द्यावे, अशी मागणी काही जणांनी पुढे केली होती. तर भाजपमधून काही जणांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी झाली होती. दरम्यान, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उद्यापासून म्हणजेच गुरुवारी 5 जानेवारीपासून सुरू वाहतूक सुरू होणार आहे. विमानसेवेसाठी प्रवाशांना ने-आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारीही सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

DA DR Hike July 2026 Announcement
SIM card misuse 3 years jail
IndiGo Goa Delhi Flight Emergency Landing
Mopa Airport Link Highway Toll
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com