Man drown in Navelim Dainik Gomantak
गोवा

दारुमुळे घात झाला; नावेलीत तळ्यात बुडून एकाचा मृत्यू

आंघोळीसाठी तळ्यात उतरला असताना दुर्घटना; उपचारापूर्वीच मृत्यू

दैनिक गोमन्तक

मडगाव : दक्षिण गोव्यातील नावेली येथे एक व्यक्ती तळ्यात बुडाल्याची घटना घडली आहे. दारुच्या नशेत तळ्यात उतरलेल्या इसमाचा बुडून मृत्यू झाला आहे. तियागो मारियानो पिरिस असं या 52 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.

नावेली येथे असलेल्या एका तळ्यात तो आंघोळीसाठी उतरला होता. काही वेळ झाल्यांनतर तो बाहेर आला नसल्याने त्याच्या अन्य एका नातेवाईकाने तळ्यात उतरून त्याचा शोध घेतला. यावेळी नाकातोंडात पाणी गेलेल्या अवस्थेत त्याला बाहेर काढण्यात आलं. हालचाल न दिसल्याने त्याला मडगाव येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा बुडालेला व्यक्ती दारुच्या नशेत असल्याचं निष्पन्न झालं आहे.

दुसरीकडे ओकांब-धारबांदोडा येथील दूधसागर नदीत एकजण बुडाल्याची दुर्घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. मूळ उत्तर प्रदेश राज्यातील पण सध्या तिस्क - उसगाव येथे राहणारा सिद्धू मितेश मिश्रा (24) हा युवक दूधसागर नदीत बुडाला या बेपत्ता युवकाचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. मात्र प्रतिक्षेनंतर सिद्धू मिश्रा या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT