Ashwem-Mandrem Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: आश्वे-मांद्रेत दीड लाखाचे अमली पदार्थ जप्त; रेस्टॉरंट व्यवस्थापकास अटक

संशयित अब्दुला हा मूळचा मंगलोर येथील

Akshay Nirmale

Goa Crime: आश्‍वे-मांद्रे येथील रेस्टॉरंट्सचा व्यवस्थापक अब्दुला कुन्हीयालियब्बा बर्दिला (51) याला कोकेन व एमडीएमए या अमली पदार्थांसह पोलिसांनी अटक केली. या अमली पदार्थांची बाजारपेठेतील किंमत सुमारे दीड लाख रूपयांच्या आसपास आहे. ही कारवाई काल मध्यरात्री करण्यात आली.

संशयित अब्दुला हा मूळचा मंगलोर येथील असून रेस्टॉरंट्समध्ये व्यवस्थापकाचे काम करण्याबरोबरच तो ग्राहकांना विविध प्रकारचे अंमलीपदार्थ पुरवत होता. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

मांद्रे येथील एका रेस्टॉरंट्समध्ये तेथील कर्मचारीच ड्रग्ज पुरवठा करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. ड्रग्ज मिळत असल्याने या रेस्टॉरंट्समध्ये देशी तसेच विदेशी पर्यटकांची मोठी वर्दळ होती. त्यामुळे पोलिस पथकाने अचानक या रेस्टॉरंट्समध्ये धाड टाकत व्यवस्थापकाला ताब्यात घेतले. त्याच्या काऊंटरची तसेच त्याची वैयक्तिक झडती घेण्यात आली. या कारवाईवेळी त्याच्याजवळ 12.64 ग्रॅम कोकेन व 3.82 ग्रॅम एमडीएमए सापडला. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 1.56 लाख रुपये आहे.

पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली असता मूळ मंगलोरस्थित (कर्नाटक) संशयित अब्दुला कुन्हीयालियब्बा बर्दिला गेली अनेक वर्षे गोव्यात आहे. तो काही वर्षे मुंबईत कामाला गेला होता पण परत तो गोव्यात आला होता. तो या रेस्टॉरंट्सचा व्यवस्थापक असण्याबरोबरच जोडधंदा म्हणून रेस्टॉरंट्समध्ये येणाऱ्या ग्राहकांना ड्रग्ज पुरवठा करण्याचेही काम करत होता. भाजप नेत्या टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणानंतर हॉटेल्स तसेच रेस्टॉरंट्समध्ये ड्रग्जची विक्री होत असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिस हॉटेल्स तसेच रेस्टॉरंट्समध्ये छापे टाकत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: हवेत झेप अन् एकहाती कॅच! फिल सॉल्ट बनला 'स्पायडरमॅन', इशान किशनचा घेतला अप्रतिम झेल; फील्डिंगचा सर्वात मोठा थरार

Viral Video: रॅम्प वॉक अन् काळजाचा ठोका चुकला! भर स्टेजवर मॉडेलसोबत घडला अघटित प्रकार; पुढ जे घडलं ते तुम्हीच बघा

Pakistan IMF Bailout Package: भीक मागण्यात पाकिस्तान 'सुपरस्टार'! आता आयएमएफनं वाचवला पाकड्यांचा जीव; 1.2 अब्ज डॉलर्स मंजूर

VIDEO: गोवा तापला! मार्चमध्येच मे महिन्याच्या झळा; अंगाची लाहीलाही झाल्यावर कुत्र्याने शोधला पाण्याचा गारवा; पाहा व्हिडिओ

VIDEO: 'तुला लाज वाटत नाही का, आतंकी...'; मुस्लिम विद्यार्थ्यावर डाफरणाऱ्या प्राध्यापकाचा अजब अवतार; बंगळुरुतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT