Mapusa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case : बोडगिणी-म्हापसा येथे 6 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

संशयिताची पोलिस कोठडीत रवानगी

दैनिक गोमन्तक डिजिटल

बोडगिणी-म्हापसा येथे अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकून 60 ग्रॅम मेटाएम्फेटामाईन ड्रग्ज जप्त करून आल्त-म्हापसा येथील अनिल गडेकर याला अटक केली.

जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुमारे 6 लाख रुपये आहे. संशयिताची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

कक्षाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण बोडगिणी परिसरात रात्रीच्यावेळी ड्रग्जची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे सापळा लावण्यात आला होता.

मध्यरात्रीनंतर एक तरुण त्या ठिकाणी आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ अमलीपदार्थ सापडले.

ड्रग्ज किट्सद्वारे त्याची तपासणी केली असता ते मेटाएम्फेटामाईन असल्याचे स्पष्ट झाले. अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT