Margao Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Margao Drugs Case: नागोवा येथे 4 लाखांचे ड्रग्ज जप्त, अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

हडमना उर्फ हनुमान राम (वय 32, रा. राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Drugs Case काही वर्षापूर्वी केवळ किनारपट्टी भागापुरता मर्यादित असलेला ड्रग्स व्यवसाय आता गोव्यात खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला आहे. गुन्हेगारी आणि अपघातांचे सत्र रोखण्यासाठी गोवा पोलीस, गोवा वाहतूक पोलीस त्यांचे काम करत आहेत. यासोबतच गोव्यात अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकही सतर्कतेने कार्यरत असल्याचे या पथकाच्या छापेमारीवरून वेळोवेळी दिसून येते.

नुकतंच मडगाव येथील नागोवा येथे गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून एकाला अटक केलीय. हडमना उर्फ हनुमान राम (वय 32, रा. राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 4 लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केलेय. गोव्यात अमली पदार्थ विरोधी पथक अशा घटनांवर वेळोवेळी कारवाई करत असून राज्यातील अनेक ड्रग्ज प्रकाराने उघड होत आहेत.

काही दिवसांपूर्वी शिवोली आणि सासष्टी या ग्रामीण भागात देखील या पथकाने कारवाई करत लाखोंचे ड्रग्ज जप्त केले होते. एकूणच गोव्यातील वाढत जाणारे ड्रग्जचे प्रमाण हा चिंतेचा विषय बनत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT