Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: गिरी-पणजीत 22 लाखांचे अमली पदार्थ जप्त; केरळ, हैदराबादचे युवक जेरबंद

रात्री पर्यटकांना गाठून ड्रग्स विक्री

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drugs Case: राज्यात पर्यटन हंगाम सुरू असल्याने ड्रग्स विक्रेतेही भलतेच सक्रिय झाले आहेत. रात्रीच्यावेळी पर्यटकांना गाठून ड्रग्सची खुलेआम विक्री केली जात आहे.

पोलिसांनी पणजी आणि गिरी येथे केलेल्या कारवाईत 22लाखांचे ड्रग्स जप्त केले. याप्रकरणी केरळ व हैदराबाद येथील तरुणांना अटक करून त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.

एनसीबीने किनारपट्टी भागात केलेल्या कारवाईनंतर गोवा पोलिस पुन्हा जागे होऊन ‘ॲक्टीव्ह मोड’वर आले आहेत.

येथील जुन्या सचिवालय परिसरात काही ड्रग्स दलाल रात्री पर्यटकांना ड्रग्सची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती.

त्यामुळे शनिवारी संध्याकाळी या परिसरात साध्या वेशातील पोलिस तैनात केले होते. रात्री पावणेदहाच्या एक तरुण आतील रस्त्यावर संशयास्पदरित्या फिरताना व पर्यटकांशी संवाद साधताना दिसला.

त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली, अशी माहिती पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी दिली.

बनावट ग्राहकाच्या जाळ्यात शिकार

ड्रग्सविरोधी पथकाने गिरी येथे सापळा रचून केरळ येथील सेरिन सगीर (27) याला 21.20 ग्रॅम एलएसडी व 50 ग्रॅम गांजासह अटक केली. त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी पाळत ठेवली होती. बनावट ग्राहक बनवून त्याच्याकडे पाठवले असता तो जाळ्यात सापडला.

तो गेल्या 4 वर्षांपासून गोव्यात आहे. सध्या तो म्हापसा येथे भाडेपट्टीवर राहात होता. त्याचे इतर ड्रग्स विक्रेत्यांशीही संबंध असल्याने त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक रोहन मडगावकर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT