Drugs Seized in Madgaon Dainik Gomantak
गोवा

मडगावात 2.70 लाख रुपयांच्या गांजासह तरुणाला बेड्या

2.70 किलो गांजा जप्त, ओडिशातून अमली पदार्थांच्या तस्करीची शक्यता

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : मडगाव रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थ विकण्याचा व्यवहार तेजीत चालू असतानाच काल रात्री उशिरा मडगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत शेन डोमेरिस या 27 वर्षीय युवकाला अटक केली. त्याच्याकडून 2.70 किलो गांजा जप्त केला. या मालाची किंमत बाजारात 2.70 लाख रुपये आहे. (Drugs Seized in Madgaon News Updates)

मडगावचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार शेन गांजा विकण्यासाठी रेल्वे स्टेशन आवारात असलेल्या फायर ब्रिगेड स्टेशनजवळ येणार अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर या परिसरात सापळा रचून त्याला जेरबंद केले. हा माल ओडिशातून आणला असावा अशी शक्यता मडगाव पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सागर धाटकर हे करत असून कारवाईत निरीक्षक नार्वेकर आणि उपअधीक्षक गुरुदास कदम व सनी गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विराग परब, सहाय्यक उपनिरीक्षक दिलकुश वेळीप, हवालदार गोरखनाथ गावस, पोलीस शिपाई विशाल प्रभू व कल्पेश खोलकर यांनी भाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health And Motor Insurance Price Cut: सर्वसामान्यांसाठी खूशखबर! स्वस्त होणार हेल्थ आणि मोटर इन्शुरन्स; अवाजवी कमिशनला लागणार लवकरच ब्रेक

Horoscope 25 Saptember 2026: धनलाभाचा प्रबळ योग आणि यशाचा मार्ग खुला! लाडक्या बाप्पाला निरोप देताना उजळणार 'या' राशींचं भाग्य; ग्रह-नक्षत्रांची मोठी उलथापालथ

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT