Telangana Dainik Gomantak
गोवा

Telangana: YSR काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या रेव्ह पार्टीसाठी गोव्यातून मागवले अमली पदार्थ, मुख्य आरोपीला अटक

गोव्यातून हैद्राबादला तस्करी होणाऱ्या अमली पदार्थाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

Pramod Yadav

Telangana: नेल्लोर, आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी नेत्याच्या मुलाने वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीत सापडलेले अमली पदार्थ गोव्यातून आणले होते. अशी माहिती तेलंगणा राज्य अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी दिली.

रेव्ह पार्टीत सापडलेले अमली पदार्थाची गोव्यातून हैदराबादला वाहतूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी अलिकडेच अमीरपेट मैत्रीवनममध्ये एक्स्टसी गोळ्या जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी याप्रकरणी नेल्लोर जिल्ह्यातून मुख्य आरोपी आशिक यादव आणि राजेश यांना अटक केली आहे. आशिक आणि राजेश यांनी गोव्यातील बाबा नावाच्या व्यक्तीकडून 60 एक्स्टसी गोळ्या खरेदी केल्या होत्या.

तेलंगणा पोलिसांच्या पथकाने गोव्यात जाऊन चार दिवस शोध घेतला आणि अचूक माहितीच्या आधारे त्याला अटक केली. आरोपी बाबाचे खरे नाव हनुमंत बाबू सोडिवकर (वय 50) आहे.

एक्स्टसी गोळ्या हैदराबादमध्ये तस्करांना प्रत्येकी 1,000-1,200 रुपयांना विकल्या जातात. आरोपीला अटक करून 60 गोळ्या जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोव्यातून हैद्राबादला तस्करी होणाऱ्या अमली पदार्थाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

गोव्यातून हैद्राबादला तस्करी होणाऱ्या अमली पदार्थाचा मुद्दा वारंवार चर्चेत येत असतो. हैद्राबाद पोलिसांनी अमली पदार्थ कारवाई बाबतचे गोवा कनेक्शन नेहमी उघड केले आहे.

तसेच, गोव्यातून अनेक पेडलर्स हैद्राबादमध्ये सक्रिय असल्याचा दावा देखील तेथील पोलिसांनी केला होता. दरम्यान, या कारवाईमुळे पुन्हा एकदा गोव्यातून हैद्राबादला तस्करी होणाऱ्या अमली पदार्थाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT