Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

Margao Goa Crime News: या अमली पदार्थं विक्री प्रकरणाचा मुख्य सूत्रधार तेहरान ऊर्फ टेरेंस फर्नांडिस पोलिसांना चकवा देऊन पळून गेला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: मोडसाय-बड्डे येथे एका घरात सुरू असलेल्या ड्रग्स धंद्याचा फातोर्डा पोलिसांनी पर्दाफाश करताना १.१० लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. तसेच एक लाख ५६०० रुपये व एक एअरगनही जप्त केली.

या अमली पदार्थं विक्री प्रकरणाचा मुख्य सूत्रधार तेहरान ऊर्फ टेरेंस फर्नांडिस पोलिसांना चकवा देऊन पळून गेला. पोलिस त्याच्या शोधात आहेत. सोमवारी सायंकाळी ७च्या वाजण्याच्या दरम्यान हा छापा टाकण्यात आला.

अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदा २० (ब), २१ (ब), २२ (ब) कायद्याखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक नेथॉन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. देविदास पुढील तपास करीत आहेत. बड्डे येथील या घरात ड्रग्स विक्री चालू असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी या घरावर पाळत ठेवली होती. सोमवारी पोलिसांनी छापा टाकला असता, १.१०० किलो गांजा, चार टॅब, तीन वजनमाप यंत्रे व बेडरूममध्ये रोकड सापडली. पोलिसांनी छापा टाकण्याच्या पूर्वी संशयित तेहरान हा घरातील दुसऱ्या एका दारातून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime: APK File डाउनलोड करणं पडलं महागात! आके येथील महिलेच्या बँक खात्यातून 6.5 लाख उकळले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News: आई आणि लहान भावाचा 17 वर्षीय अर्जुननं काढला काटा, चॅटजीपीटीला विचारायचा ठार मारण्याचा प्लॅन; अखेर 'सायको किलर' पोलिसांच्या ताब्यात VIDEO

Bison In Goa: नार्वेत गव्यांचा धुमाकूळ! भाजी पिकाची नासधूस, बंदोबस्‍ताची मागणी; ऐन पिकाच्या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका

Google Pixel 11 Series भारतात लॉन्च! 5x झूम, Magic Capture अन् Gemini AIसह मिळणार भन्नाट फीचर्स; किंमत किती? जाणून घ्या

Surya Gochar 2026: 31 ऑगस्टला सूर्याचा ‘पूर्वाफाल्गुनी’ नक्षत्रात महाधमाका! 'या' 5 राशींची चांदीच चांदी; मिळणार राजासारखे वैभव

SCROLL FOR NEXT