Drugs  Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs : गोव्यात लहान दुकाने, गाड्यांवर सिगारेटमधून गांजाचा वापर!

गावांतही मिळते ड्रग्‍स : धार्मिक फोंडा तालुक्‍यात अमलीपदार्थांचा शिरकाव

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drugs : गोवा म्हणजे पर्यटनदृष्‍ट्या नंदनवन. पण या नंदनवनाला अंमलीपदार्थांचा अर्थातच ड्रग्सचा शाप लागल्याने हे नंदनवन सध्या बेचिराख होऊ लागले आहे. एक काळ अंमलीपदार्थांचा व्यवहार हा केवळ किनारपट्टी भागापुरता मर्यादित होता, पण आता शहरांबरोबरच गावागावांत ड्रग्‍स पोचत असल्याने युवा पिढीसाठी ही धोक्‍याची घंटा असल्याच्या प्रतिक्रिया जाणकारांकडून व्यक्त होत आहेत. तालुक्यातील काही गाडे व दुकानांवर सिगारेटमधून गांजा टाकून दिला जात असल्याचा संशय आहे. गांजा सर्रासपणे देशातच उपलब्ध होत असल्याने त्याची वाहतूकही खुलेआम होत आहे.

खरे म्हणजे राज्याची सांस्कृतिक नगरी म्हणून फोंडा तालुक्याला अर्थातच अंत्रुजनगरीला ओळखले जाते. देवदेवतांचा प्रदेश त्यातच सुंदर निसर्ग यामुळे साहजिकच देशी, विदेशी पर्यटक फोंडा तालुक्याकडे आकृष्ट होतात. अशा या सुंदर फोंडा तालुक्यात फोंडा, शिरोडा तसेच इतर भागांतही खुलेआम अंमलीपदार्थांचा व्यवहार होत असल्याने राज्याच्या या सांस्कृतिक नगरीला फार मोठा धोका निर्माण झाला आहे.

मागच्या दोन वर्षांत फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत एकूण सातजणांना अंमलीपदार्थाच्या व्यवहारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विशेषतः या लोकांकडे गांजा सापडला असून फोंडा तसेच शिरोडा बसस्थानकाबरोबरच कुर्टी परिसर, माशेल, बाणस्तारीसारख्या इतर उपनगरी भागातही ही कारवाई झाल्याने फोंड्याचे नाव अंमलीपदार्थ व्यवहारप्रकरणी घेतले जात आहे.

फोंडा पोलिसांची चांगली कामगिरी असली तरी ही कारवाई म्हणजे एखाद्या हिमनगाचे टोक तर नाही ना, अशी शंका सुजाण नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणेने अंमलीपदार्थ व्यवहार प्रकरणी अधिक सजग असायला हवे, असेही नागरिक बोलताना आढळतात.

दोन वर्षांत सात छापे

फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांत अंमलीपदार्थ व्यवहारात गुंतलेल्‍या एकूण सातजणांना पकडण्यात आले. फोंडा शहर परिसर, बसस्थानक परिसर तसेच तालुक्यातील अन्य उपनगरी भागातही हे छापे टाकून अनेकांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Viral Video: चिंबल येथील पंचसदस्याच्या व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ! CM सावंतांचे वेधले लक्ष; ग्रामसभेत होणार चर्चा

Goa Live News: कोळसा प्रकल्पांना विरोध करणाऱ्या गोव्यातील लोकांना NAPM कडून पाठिंबा

Goa ZP Election: कुर्टीमुळे फोंड्यात नवी समीकरणे! हरमलमध्‍ये आणले सौभाग्‍यवतींना पुढे; जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी

Bicholim Water Crisis: डिचोलीत 3 दिवसांपासून नळ कोरडे! जनतेत संताप; पाण्यासाठी गृहिणींवर अश्रू गाळण्याची पाळी

Goa Crime: खोटे 'आधार कार्ड' दाखवून दिली डिजिटल अरेस्टची धमकी! कासावलीतील व्यक्तीला 2 कोटींचा गंडा; संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT