drowned Student in goa Dainik Gomantak
गोवा

विद्यार्थी बुडून मृत्यूप्रकरणी शिक्षकांवर टांगती तलवार!

अत्याचार आरोपातून दोषमुक्त झाले तरीही शिक्षक मात्र टेन्‍शन

दैनिक गोमन्तक

पणजी : तुये-पेडणे येथील डॉन बॉस्को हायस्कूल वसतिगृहात राहणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा चिरेखाणी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी विद्यालयाच्या मुख्याध्यापकासह चार शिक्षकांना बालन्यायालयाने अत्‍याचाराच्‍या आरोपातून मुक्त केले आहे. मात्र सदोष मनुष्यवधाच्‍या आरोपाखाली ही सुनावणी घेण्यासाठी हे प्रकरण आता प्रथमवर्ग न्यायालयाकडे वर्ग केले आहे. त्यामुळे ‘त्या’ चार शिक्षकांवरील टांगती तलवार अजूनही कायम आहे.

चिरेखाणीत बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिसांत तक्रारी दाखल करून या घटनेला शिक्षकांना जबाबदार धरले होते व त्यांच्याविरोधात पेडणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मुख्याध्यापक एडविन बार्रेटो, शिक्षक क्लिफर्ड निमोस, मेलरॉय मास्कारेन्हस तसेच इनासिओ पिरीस यांच्याविरुद्ध भादंसंच्या कलम 304 (सदोष मनुष्यवधाचा गुन्हा) व बाल कायद्याच्या कलम 8 खाली गुन्हा दाखल केला होता.

बुडून मृत्यू पावलेले चारही विद्यार्थी फेड्रिक फर्नांडिस, दानिश नाझारेथ शेख, जोनस फेलिक्स डायस व प्रिन्स दास हे अल्पवयीन होते. त्यामुळे बाल कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता. या आरोपपत्रावरील सुनावणीवेळी संशयित शिक्षकांतर्फे बाल कायद्यातील कलम 8 ला आव्हान दिले होते. या घटनेवेळी अल्पवयीन मुलांवर अत्याचार होण्याचा प्रसंगच घडला नसल्याने हे कलम वगळण्यात यावे अशी बाजू मांडण्यात आली होती.

बालन्यायालयाने बाल कायद्यातील कलम 8 रद्द करत उर्वरित भादंसं कलम ३०४ खालील सुनावणी प्रथमवर्ग न्यायालयाकडे वर्ग केली आहे. पोलिसांना पुढील प्रक्रिया करण्यास सूचना केल्या आहेत. त्यामुळे अत्याचाराच्या आरोपातून संशयित शिक्षकांना मुक्त करण्यात आले तरी निष्काळजीपणाच्या आरोपाखाली पुढील सुनावणी पेडणे प्रथमश्रेणी न्यायालयात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Heart Health: स्क्रिनच्या अतिवापरामुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका! वाचा काय आहे डिजिटल युगातील 'Heart Attack'

उद्धवस्त रनवे आणि जळालेल्या इमारती विजय वाटत असेल तर त्यांनी त्याचा आनंद घ्यावा; 3 मिनिटांत भारताने पाकच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला Watch Video

Goa University: गोवा विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिकाचोरीचे पुढे काय झाले?

Goa Politics: गोव्यात विरोधक एकत्र येऊ शकतील?

अग्रलेख : खराब रस्ते रोजगार पुरवतात हे तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT