Traffic Rules Violation in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Rule: वाहनचालकांनो सावधान! आता दोनदा अपघात झाल्यास लायसन्स होणार रद्द...

वाहतूक नियमभंगाचे गुन्हे थेट लायसन्सशी लिंक करण्यात येणार

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Traffic Rule: पर्यटनाच्या दृष्टीने देशात आणि जगात प्रसिद्ध असल्याने गोव्यात देशी-विदेशी पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यामुळे गोव्यातील प्रमुख रस्त्यांवर पर्यटन हंगाम काळात वाहतुकीची मोठी कोंडीही दिसून येते.

वाहतुकीचे नियम कडक असूनही राज्यात मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात घडतात आणि अशा अपघातातील मृत्यूंची संख्याही दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येते. या पार्श्वभुमीवर आता गोव्यातील वाहतुकीला आणखी शिस्त लागावी या उद्देशाने वाहतूक खात्याने नवीन निर्णय घेतले आहेत.

त्यानुसार आता वाहतूक नियमांचां भंग करून एकापेक्षा अधिकवेळा अपघाताला कारणीभूत ठरल्यास संबंधित वाहनचालकाचा वाहतूक परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे.

गुरूवारी वाहतूक पोलीस अधीक्षक बॉसुएट सिल्वा यांनी वाहतूक परवाने नूतनीकरणासाठी येणाऱ्या चालकांची वाहन चालवण्याची नव्याने चाचणी घेण्यात यावी. त्यात जे अनुत्तीर्ण ठरतील त्यांचे परवाने तत्काळ निलंबित करावेत, असा सल्ला वाहतूक खात्याला दिला होता. त्यानंतर आता ही माहिती समोर येत आहे.

वाहतूक नियमांचां भंग करणाऱ्यांचा डाटा थेट त्यांच्या लायसन्सशी लिंक करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांच्या गुन्ह्यांचे मोजमाप करता येणे शक्य होणार आहे. त्यानुसार संबंधित वाहनचालकावर कारवाईही करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, एकापेक्षा अधिक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन करून अपघातांस कारणीभूत ठरल्याचे दिसून आल्यास वाहतूक परवाना कायमचा निलंबित केला जाऊ शकतो.

वाहन चालवताना अनेकजण नियमभंग करत असतात. परंतु, त्याची एकत्रित माहिती वाहतूक खात्याकडे नसते. यापुढे मात्र संबंधित नियमभंगाच्या घटना थेट वाहतूक परवान्याशी लिंक केल्या जातील. या सुविधेची अंमलबजावणीही सुरू झालेली आहे.

त्याच्या आधारे वारंवार सिग्नलचे नियम मोडणारे, भरधाव वेगाने वाहने चालवणारे तसेच मद्याच्या नशेत वाहने हाकून अपघातांना कारणीभूत ठरत इतरांचा बळी घेणाऱ्यांचे परवाने कायमचे निलंबित करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. इतर वाहतूक नियमांचा भंग केलेल्यांचे सक्तीने समुपदेशनही केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beach Shacks: 'प्रत्येक वेळी शॅक मालकांवरच कारवाई का'? व्यावसायिकांचा संतप्त सवाल; वस्तुस्थिती तपासण्याची मागणी

Goa Accident: बाईक-टॅंकरचा अपघात, ‘बिट्स’च्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू; निष्काळजीपणाबद्दल टँकरचालक अटकेत

Margao: मडगावचा ‘मास्टर प्लॅन’ अडकला कुठे? आमदार सरदेसाईंचा सवाल; 'प्लॅन’ मध्ये अनेक गुप्त गोष्टी लपल्याचा दावा

March 2026: 'मार्च' संपत का नाहीये? युद्ध, वर्ल्ड कप, ‘धुरंधर 2’ची क्रेझ, एलपीजी टंचाई; पहा या महिन्यात नेमके काय काय घडले?

Chimbel: ‘बजेट’ शिपायाने बनवले काय? चिंबल ग्रामसभेत सरपंचांना संतप्त सवाल; पंचायत मंडळावर ग्रामस्थांची जोरदार टीका

SCROLL FOR NEXT