Goa Beach Rescue  Dainik Gomantak
गोवा

'दृष्टी'ने सहा महिन्यात 317 जणांना दिले जीवदान; कळंगुट, बागा, कांदोळीत सर्वाधिक बचावकार्य

107 बेपत्ता लहान मुलांचा शोध घेण्यात दृष्टी जीवरक्षकांना यश आले आहे.

Pramod Yadav

गोव्यात समुद्रकिनाऱ्यावर घडणाऱ्या विविध दुर्घटनांमधून लोकांचे बचावकार्य करण्यासाठी दृष्टी जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील सहा महिन्यात राज्यात 317 जणांना जीवदान देण्यात आले असून, 107 बेपत्ता लहान मुलांचा शोध घेण्यात दृष्टी जीवरक्षकांना यश आले आहे.

जानेवारी ते जून 2023 या काळात हे बचावकार्य करण्यात आले असून, सरासरी दर दिवशी एकाचा जीव वाचविण्यात आला आहे.

राज्यातील प्रसिद्ध बीच कळंगुट, कांदोळी आणि बागा येथे सर्वाधिक बचावकार्य करण्यात आले आणि बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात आला. दृष्टीच्या माहितीनुसार या तीन ठिकाणी सर्वाधिक 140 अशा घटना घडल्या आहेत. पाण्यात बुडणाऱ्या लोकांचा बचाव, प्रथमोपचार आणि विविध प्रकारची मदत दृष्टीच्या जीवरक्षकांनी केली आहे.

पर्यटन हंगामात राज्यातील सर्व बीचवर पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. यात पाण्यात बुडण्यासह, वॉटर स्पोर्ट्स करताना होणारे अपघात, आणि लहान मुले बेपत्ता होण्याच्या घटना घडतात. यात दृष्टी जीवरक्षक महत्वाची भूमिका बजावतात.

उत्तर गोव्यातील कळंगुट, बागा आणि कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ पाहायला मिळते. कोरोनानंतर यावर्षी अधिक संख्येने पर्यटकांनी गोव्यात हजेरी लावली होती. याकाळात येथे लहान मुले बेपत्ता होण्याच्या घटना घडल्या.

कळंगुटमध्ये अशा 46 घटना तर, बागावर 29 घटना घडल्या. मात्र दृष्टी जीवरक्षकांच्या मदतीने मुलांना पुन्हा त्यांच्या पालकांशी भेटवण्यात यश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT