Goa Beach Rescue  Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या समुद्र किनार्‍यावर बचावकार्य; पुणे, मुंबई, दिल्लीतील सहा पर्यटकांना जीवदान

पाळोळे बीचवर 53 वर्षीय पर्यटक आणि केळशी येथील समुद्रकिनाऱ्यावर 15 वर्षीय मुलीला वाचविण्यात आले.

Pramod Yadav

Goa Beach Rescue: गोव्यात सध्या पर्यटन हंगाम जोमात सुरू आहे, शिवाय बऱ्याच ठिकाणी सुटट्या सुरू झाल्याने देशातील विविध राज्यातून पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी येत आहेत. दरम्यान, राज्यातील समुद्र किनार्‍यावर अनपेक्षित घटना घडत असतात. असेच मागील आठवड्यात राज्यातील विविध समुद्र किनार्‍यावर सहा घटना घडल्या त्यात पुणे, मुंबई, दिल्लीतील सहा पर्यटकांना जीवदान देण्यात आले.

मागील आठवड्यात दृष्टी जीवरक्षकांनी गोव्याच्या किनार्‍यावर सहा बचावकार्य केले. यात पाळोळे बीचवर 53 वर्षीय पर्यटक आणि केळशी येथील समुद्रकिनाऱ्यावर 15 वर्षीय मुलीची सुटका करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, केळशी येथील समुद्रकिनाऱ्यावर दिल्लीतील किशोरवयीन मुलगी समुद्राच्या खोल पाण्यात पोहताना अत्यवस्थ झाली. पाण्याचा प्रवाह तिला खोल समुद्रात खेचत होता, दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या दृष्टीचे जीवनरक्षकांनी मुलींचा आवज ऐकून सावध झाले आणि जेट-स्की आणि रेस्क्यू ट्यूबच्या मदतीने तिला परत किनाऱ्यावर आणले.

दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातील 53 वर्षीय पर्यटकाचा बोटिंग करताना अपघात झाला. पर्यटक बोटिंग करताना अचानक खाली पडला. यावेळी समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या दृष्टी जीवनरक्षकांनी जवळच असलेल्या दुसऱ्या जेट-स्की ऑपरेटर याच्याशी समन्वय साधत पर्यटकाला सुखरूप किनाऱ्यावर आणले.

आगोंद येथे दुहेरी बचावकार्य करण्यात आले. ज्यात पुण्यातील अनुक्रमे 26 आणि 25 वर्षे वयाच्या पुरुष आणि महिला समुद्रात पोहत असताना अचानक आलेल्या लाटेने त्यांना समुद्रात ओढले. जीवरक्षकांनी त्या दोघांना रेस्क्यू ट्यूबच्या मदतीने बाहेर काढले.

तसेच, आगोंद बीचवर मुंबईतील एका 39 वर्षीय महिलेला वाचविण्यात दृष्टी जीवरक्षकांना यश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

Goa Heavy Rain: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या कारवर कोसळले झाड; आई अन् दोन मुले सुखरूप

Goa Heavy Rain: साळ-खोलपेवाडी येथे घरावर कोसळला वृक्ष; दोन लाखांच्या मालमत्तेचे नुकसान, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

Goa Water Supply: धरणांमधील पाणी वाढवण्‍यावर आता जलसंपदा खात्‍याचे लक्ष; शुद्धीकरणासाठी 'पेयजल'क‍डून नद्यांतील पाण्‍याचा वापर

Borim Bridge: लाखो रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात बोरी पुलावर खड्डे; दुरुस्ती कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT