Drishti lifeguards Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: गोव्याच्या किनाऱ्यांवर सावधान! 2024 मध्ये समुद्रात बुडणाऱ्या 950 पर्यटकांचे 'दृष्टी'ने वाचवले प्राण

Tourist safety on beaches: जीवरक्षक संस्था दृष्टीच्या बचाव कार्यांच्या यादीत ४८७ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. त्यापैकी कर्नाटक (११९) आणि महाराष्ट्र (१०६) या दोन राज्यातील नागरिकांचा सर्वाधिक समावेश होता.

Sameer Amunekar

पणजी : गेल्या वर्षात २०२४ मध्ये समुद्रात बुडणाऱ्या 950 जणांना वाचवण्यात आले होते. ज्यात ६३९ समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती जीवरक्षक संस्था दृष्टीकडून देण्यात आली आहे. कळंगुट, बागा हे किनारे याबाबतीत अतिसंवेदनशील ठरले आहेत.

दृष्टीने दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये ६३९ लोकांना बुडण्यापासून वाचवले. तसंच इतर घटनांमध्ये वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार देणे, हरवलेल्या मुलांचा शोध घेणे आणि त्यांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवणे अशा १४६ घटनांचा समावेश आहे.

२०२४ मधील सर्व घटनांमध्ये जीवरक्षकांनी वाचवलेल्या सुमारे ९५० जणांच्या तुलनेत, २०२३ ला ही संख्या ७०२ होती, जी गोव्याच्या किनाऱ्यावरील आणि दूधसागर धबधब्यावरील जीवरक्षकांच्या हस्तक्षेपाची आवश्यकता असलेल्या घटनांमध्ये ३५.३ टक्के वाढ दर्शवते.

जीवरक्षक संस्था दृष्टीच्या बचाव कार्यांच्या यादीत ४८७ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. त्यापैकी कर्नाटक (११९) आणि महाराष्ट्र (१०६) या दोन राज्यातील नागरिकांचा सर्वाधिक समावेश होता. २०२४ मध्ये बुडण्यापासून वाचवण्यात आलेल्या १२० परदेशी नागरिकांमध्ये, रशियन (७०) आणि यूके नागरिक (१६) आणि इतर काही देशांमधील नागरीक होते.

बुडण्यापासून वाचवण्यात आलेल्या नागरिकांच्या यादित कळंगुट समुद्रकिनारा पहिल्या क्रमांकावर आहे. येथे १६४ जणांना वाचवण्यात यश आले. त्यानंतर बागा येथे १४७ आणि उत्तर गोव्यातील कांदोळीमध्ये ६६ घटना घडल्या, जिथे एकूण ५४५ घटना नोंदवल्या गेल्या होत्या.

दक्षिण गोव्यात २३९ लोकांना बुडण्यापासून वाचवण्यात आलं आहे. कोलवा समुद्रकिनाऱ्यावर ३८ घटना घडल्या ज्यांमध्ये जीवरक्षकांच्या हस्तक्षेपाची आवश्यकता होती. त्यानंतर पाळोळे समुद्रकिनाऱ्याचा क्रमांक लागतो, या ठिकाणी ३८ घटना घडल्या.

दृष्टीने दिलेल्या माहितीनूसार, डिसेंबर महिन्यात २०२४ मध्ये सर्वाधिक घटना घडल्या आहेत. हिवाळ्यात १४१ घटना घडल्या, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ११७ आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ११३ घटना घडल्या.

२६ ते ३५ वर्षे वयोगटातील २१५ व्यक्तींना बुडण्यापासून वाचवण्यात आलं. तर १९ ते २५ वर्षे वयोगटातील १५४ व्यक्तींना आणि १२ वर्षे आणि त्याखालील वयोगटातील ३३ मुलांना वाचवण्यात आलं आहे. ९५० घटनांपैकी ६८० घटनांमध्ये पुरुष तर २६९ घटनांमध्ये महिलांचा समावेश होता.

१४६ घटनांमध्ये लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याच्या घटना घडल्या, त्यापैकी बहुतेक घटना १२ वर्षे आणि त्याखालील मुलांशी संबंधित होत्या. "जानेवारी ते डिसेंबर २०२४ पर्यंत १३९ मुले बेपत्ता झाल्याची प्रकरणे समोर आली होती. दृष्टीने यशस्वीरीत्या बेपत्ता मुलांचा शोध घेत, त्यांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवले" जीवरक्षक संस्था दृष्टचे सीईओ नवीन अवस्थी यांनी सांगितलं.

दृष्टी मरीनचे जीवनरक्षक गोव्याच्या किनाऱ्यावर घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवून असतात. २०२४ मध्ये, ४५ नियुक्त समुद्रकिनाऱ्यांवर १५७ व्यक्तींना प्रथमोपचार देण्यात आला जिथे जीवरक्षक तैनात आहेत, ज्यामध्ये गोव्याच्या किनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांनी चावलेल्या २२ व्यक्तींचा समावेश आहे. दुर्दैवाने, २०२४ मध्ये, आठ जणांचा किनारपट्टीवरील पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दृष्टी मरीनने २००८ मध्ये गोव्यात काम सुरू केले. मागील वर्षी एकूण २०० लोकांचा बुडून मृत्यू झाला होता. ज्यामुळे राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्यास आणि बुडण्याशी संबंधित मृत्यूंना आळा घालण्यासाठी योजना आखली. जीवरक्षक सेवेमुळे बुडून होणाऱ्या मृत्यूंमध्ये ९९ टक्के घट झाली आहे. जीवरक्षकांमुळे ८००० हून अधिक लोकांचे प्राण वाचले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT