Gold Smuggling Syndicate Busted At Mopa Airport Goa: डीआरआय गोवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमातळावर तस्करीप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तिघा प्रवाशांकडून 3 कोटी 92 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, सोनेतस्करी होणार असल्याची गुप्त माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अबुधाबीहून मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका विमानातील तीन प्रवाशांना तपासणीसाठी रोखण्यात आले.
तपासणी दरम्यान डीआरआय अधिकाऱ्यांना चेक-इन केलेल्या बॅगमध्ये एका पॅकेटमध्ये आयफोन गुंडाळलेले सापडले. तर सोन्याची पेस्ट एका प्रवाशाच्या कमरेकडे लपवून ठेवली होती. तर दोन प्रवाशांच्या कपड्यांच्या आतील थरांना शिवली गेली होती.
या तीनही प्रवाशांना बेकायदेशीररित्या 7 किलो सोन्याची पेस्ट (5.7 किलोग्रॅम) आणि आयफोनची तस्करीकेल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तसेच हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संशयित इरफान रा. उत्तर प्रदेश, कामरान अहमद गयासुद्दीन खान रा. मुंबई, आणि मोहम्मद इरफान गुलाम नबी बाला पटेल रा. गुजरात अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
डीआरआयने सांगितले की, अबुधाबीहून सोन्याच्या पेस्टसह अटक करण्यात आलेले प्रवासी हे मुंबई आणि दुबई दरम्यान कार्यरत असलेल्या सोन्याच्या तस्करी रॅकेटचा भाग आहेत. 12 ऑक्टोबरला ते मुंबईहून अबुधाबीला गेले होते. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया वृत्तसंस्थेने दिले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.