नखरेल अदांनी आणि चेहऱ्यावरील मोहक हावभावांनी इंस्टावर सामाजिक संदेश देणारी कुकू शिरोडकर

Social Media Influencer Karisha Shirodkar: गोमंतकच्या 'इन्फ्लुएन्सर्स मीट'मध्ये करीशाने तिचा आतापर्यंतचा प्रवास आमच्या समोर मांडला.
Social Media Influencer Karisha Shirodkar
Social Media Influencer Karisha ShirodkarDainik Gomantak

Social Media Influencer Karisha Shirodkar: आपल्या नखरेल अदांनी आणि चेहऱ्यावरील मोहक हावभावांनी इंस्टावर विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणारी करीशा शिरोडकर अर्थात कुकू शिरोडकर ही व्यवसायाने फॅशन डिझाइनर आहे. गारमेंट टेक्नॉलॉजिचा डिप्लोमा करत असताना उपजत असणाऱ्या सभाधिटपणामुळे आणि नृत्याच्या आवडीमुळे ती स्टेज आर्टिस्ट बनली. गोमंतकच्या 'इन्फ्लुएन्सर्स मीट'मध्ये करीशाने तिचा आतापर्यंतचा प्रवास आमच्या समोर मांडला.

Social Media Influencer Karisha Shirodkar
Perfect Eating Time: चुकीच्या वेळी अन्न खाल्ल्याने बिघडू शकते तुमचे आरोग्य

अस्नोडा, जयदेववाडो येथील रहिवासी असलेली करीशा उत्तम डान्सर आहे. लहानपणापासून TV सिरियल्स पाहण्याची आवड असलेली करीशा सुरुवातीला व्हिडीओ बनवत असे. आमच्याशी बोलताना ती म्हणाली, लहानपणापासून नृत्याची आवड आणि फिल्ममधील हिरोइन्स करत असलेला डान्स बघून मला नृत्यामध्ये अधिक रस निर्माण झाला. पुढे त्यातून मी इंस्टावर सक्रिय झाले.

घरच्यांचा सपोर्ट-

आपली आवड जोपासत डिझायनर म्हणून काम करत असताना इंस्टावर मिळणाऱ्या likes, views आणि followers मुळे रिल्स बनवाण्याचा आत्मविश्वास आला होता. आईवडिलांचा स्पोर्ट मित्र मंडळींकडून प्रोत्सहन आणि मी ज्याच्या सोबत अधिक व्हिडीओ करते त्या मिथिलचा को ऑपरेशन मिळाल्यामुळे मला सक्रिय राहण्यात खूप मदत झाली.

Social Media Influencer Karisha Shirodkar
Spinal Problems: या 5 कारणांमुळे होऊ शकतात मणक्याचे आजार

पहिला व्हिडीओ आणि बरंच काही-

मला आठवतंय माझ्याकडे स्वतःचा चांगला मोबाईल नसल्याने मिथिलच्या आयफोनवर मी माझा पहिला व्हिडिओ शूट केला होता. सुरवातीचे काही व्हिडीओ मी लईराई देवीवर केले होते. त्यावेळी अनावधानाने मी शॉर्ट कपडे वापरले होते. प्रेक्षकांनी त्या व्हिडिओवर मला बरंच ट्रॉल केलं होतं. माझ्या आप्तस्वकीयांनीसुद्धा माझी चांगलीच कान उघाडणी केली होती. मात्र यातून खचून न जात मी खूप काही शिकले व पुढे व्हिडीओ करताना त्याची काळजी घेतली.

व्हिडीओ तयार करताना...

मी कपड्यांच्या बाबतीत फार चुझी आहे. कपडे, मेकअप, ज्वेलरी या सर्वांवर मी बरेच पैसे खर्च करत असते. अर्थात त्यामुळे आई-बाबांचा ओरडाही खाते. पण मी या खर्चाचा भार त्यांच्यावर टाकत नाही. मी माझ्या कमाईतूनच ही चैन करते, असे करीशा मिश्कीलपणे म्हणाली.

सर्वात जास्त views -

पिरियड्स, Life of thin girls आणि थट्टा मस्करी या topic वर केलेले व्हिडीओ खूपच व्हायरल झाले होते. साधारणतः 4 ते 5 लाख views आणि 50 हजारांवर त्यांना likes होते.

तरुणांना काय सांगशील-

इन्स्टा सारख्या सोशल मीडियावर येणाऱ्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की, जे काही कराल ते दर्जेदार करा. आईवडिलांची मानहानी होईल असे काही करू नका. त्यांच्या विरोधात जाऊन कसलेही रिल्स बनवू नका. आपली परंपरा आणि संस्कृती राखत कुणाचीही टिंगल होईल, कुणाच्याही भावना दुखावतील असे काही करू नका.

Income बद्दल -

सोशल मीडिया हे खूप अस्थिर व्यासपीठ आहे त्यामुळे यावर उत्पन्नाच्या दृष्टीने किती अवलंबून राहायचे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. मी फॅशन डिझाइनर आहे, डान्स शिकवते, नाटकांत कामं करते. त्यामुळे साहजिकच या सर्वातून मला आर्थिक लाभ होतो. पण माझ्यामते सोशल मीडियावर तुमचे व्हिडीओ नाहीच चालले तर सर्वांचा Plan B तयार असायला हवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com