Shashikant Nageshkar  Dainik gomantak
गोवा

विठ्ठल भक्तीतच ‘ते’ झाले वैकुंठात लीन

नाट्यकलाकार शशिकांत नागेशकर यांनी वारीतच ठेवला देह

गोमन्तक डिजिटल टीम

नागेशी येथील प्रसिद्ध नाट्यकलाकार शशिकांत नागेशकर हे पंढरपूर वारीला गेले होते. बुधवारी दुपारी अकस्मात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण अंत्रूज महालावर शोककळा पसरली आहे.

पंढरपूरच्या विठ्ठलावर शशिकांत नागेशकर यांची नितांत श्रद्धा. त्यातूनच एकप्रकारे विठ्ठल भक्तीच्या नादातच शशिकांत नागेशकर यांनी पंढरपूरच्या वारीत देह ठेवला.

काही वर्षांपासून शशिकांत नागेशकर आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत डिचोली येथील पंढरपूरच्या वारीत वाहनाने जाऊन पुढे सहभागी होत होते.

यावर्षीही गेल्या शुक्रवारी शशिकांत नागेशकर व त्यांचे सहकारी वाहनाने जाऊन मिरजला या वारकऱ्यांत सहभागी झाले होते.

दुपारी मुक्कामाच्या ठिकाणी भजनाच्यावेळीच दुपारी दीडच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यांना लागलीच नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले, पण त्यांचे निधन झाले.

रंगकाम तसेच गणेश मूर्ती बनवण्याबरोबरच शिल्पकलेतही शशिकांत नागेशकर तरबेज होते. नाट्य क्षेत्र म्हणजे त्यांचा आवडता विषय.

अनेक नाटकांत त्यांनी यशस्वी भूमिका साकारल्या. आपल्या अनोख्या शैलीने नाटकांचे दिग्दर्शन करताना त्यांनी गोव्यातील विविध नाट्य स्पर्धांत अव्वल क्रमांक पटकावला.

फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरातील नाट्य स्पर्धात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अहंम देवयानी‘, ‘ही श्रींची इच्छा‘, ‘स्वामी‘ या नाटकांना तर अव्वल क्रमांक आणि उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पुरस्कारही मिळाले होते. नागेशी, मडकई तसेच इतर भागातील युवा कलाकारांचे शशिकांत नागेशकर प्रेरणास्थान होते, त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करण्यात येत आहे.

अन् तो सत्कार ठरला शेवटचाच !

शशिकांत नागेशकर यांनी नाट्य दिग्दर्शन व इतर क्षेत्रात नाव कमावले, पण कुठलाच सत्कार स्वीकारला नाही. यशाच्याबाबतीत स्वतः मागे राहिले इतरांना पुढे केले.

पण गेल्या महिन्यात बरोबर एका महिन्यापूर्वी माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे सर्व कलाकारांचा नंदनवनमध्ये सत्कार करण्यात आला, त्यात खास सत्कार शशिकांत नागेशकर यांचा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

एरव्ही सत्काराला नाही म्हणणाऱ्या शशी मास्तरांनी हा सत्कार मात्र आनंदाने स्वीकारला आणि सुदिन ढवळीकरांचे ऋणही व्यक्त केले. हा सत्कार त्यांचा पहिला आणि शेवटचा ठरला.

आमच्या गावचे पण सबंध गोव्यात कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेले शशिकांत नागेशकर यांचे असे अचानक निघून जाणे चटका लावणारे आहे.

रंगकाम, चित्रकला, नाट्य अशा विविध क्षेत्रात शशिकांत नागेशकर यांनी नाव कमावले होते, नवीन कलाकार त्यांनी घडवले. अशाप्रकारचा कलाकार पुन्हा होणे नाही. त्यांच्या कुटुंबाला हे आभाळाएवढे दुःख पेलण्याची ताकद परमेश्‍वर देवो, हीच प्रार्थना.

- सुदिन ढवळीकर (वीजमंत्री, गोवा राज्य)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT