Margao News : मडगाव पालिकेच्या 'त्या' कृतीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता

नागरिकांमध्ये भीती
Margao News
Margao NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव पालिका इमारतीच्या मागे असलेल्या परिसरात नारळाच्या शेंड्या, भुसा व इतर वस्तूंचा ढीग टाकण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात हा परिसर डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक बनला आहे. अनेक लोकांनी विविध भागातील नारळाची ‘सोडणे’, भुसा आणि इतर वस्तू गोळा करून पालिका इमारतीजवळील मोकळ्या जागेत टाकल्या आहेत.

ही जागा प्रत्यक्षात नगरपालिकेच्या वाहनांच्या पार्किंगसाठी ठेवण्यात आली आहे. अनेक लोक तेथे कचरा टाकतात, असा आरोपही करण्यात आला. फातोर्डा आणि मडगाव येथे शहराच्या हद्दीत येणाऱ्या अनेक ठिकाणी, विशेषतः कचरा गोळा करण्याच्या ठिकाणांजवळ नारळाची सोडणे रस्त्याच्या कडेला टाकण्यात आली आहेत. विशेष म्हणजे शहरातील काही भागात डेंग्यू फैलावला असून त्यामुळे हा कचरा त्वरित हटविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Margao News
Panaji Rainfall: पणजीत अर्धा-पाऊण तासाच्या मुसळधार पावसाने रस्त्यावर पाण्याचे लोट; वाहनधारकांची तारांबळ

मडगावच्या मध्यभागी असा कचरा टाकल्याबद्दल चिंता व्यक्त करताना, शहरातील संजय नाईक यांनी सांगितले की, नारळाच्या करवंट्यांमध्ये पाणी साचते, ज्यामुळे डासांची उत्पत्ती होते आणि रोगांचा धोका निर्माण होईल. कचरा न उचलल्यास डासांची उत्पत्ती होईल.

Margao News
Goa BJP: राज्यसभेसाठी हालचालींना वेग

उपाययोजना हवी

आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांना या गैरप्रकाराविरुद्ध कारवाई करण्याची विनंती करतो. पालिकेने तातडीने कचरा उचलला पाहिजे, असे एका येथील दुकानदाराने सांगितले. अनेक स्थलांतरित मजूर कामाच्या शोधात या ठिकाणी जमतात, त्यांना डास चावू शकतात. मडगाव नगरपालिकेच्या माजी नगरसेवकाने उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर आपली चिंता व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Margao platform fight incident
Goa political leaders clash over development projects
Margao Municipal Council Garbage Tender Scam
drunk beggars creating nuisance in Margao
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com