Drama Festival  Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीय प्रेक्षकांसाठी मेजवानी; उद्यापासून बहुभाषिक नाट्यमहोत्‍सवाचे आयोजन

4 ते 8 डिसेंबर कालावधीत बहुभाषिक नाट्यमहोत्सवाचे आयोजन मडगाव रवींद्र भवनात करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Drama Festival: कला (Art) आणि संस्कृती (Culture) संचालनालय, पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि रवींद्र भवन मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ते 8 डिसेंबर या कालावधीत बहुभाषिक नाट्यमहोत्सवाचे आयोजन मडगाव रवींद्र भवनात करण्यात आले आहे.

महोत्सवात कोकणी, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या चार भाषांतील एकांकिका आणि भारतातील विविध राज्यांतील नामवंत दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांचा समावेश आहे.महोत्सवाचे उद्घाटन (Inauguration) शनिवार दि. 4 रोजी सायंकाळी 6:45 वाजता होणार आहे. यावळी मडगाव रवींद्र भवनाचे अध्यक्ष दामोदर नाईक, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूरच्या संचालक किरण सोनी गुप्ता यांची उपस्‍थिती असेल. सायंकाळी 7 वाजता कला अकादमीच्या (Academy) कोकणी स्पर्धेतील सतीश नार्वेकर दिग्दर्शित ‘मित्राची काणी’ हे प्रथम पारितोषिक विजेते नाटक ‘रुद्रेश्वर पणजी’ या संस्थेचे कलाकार सादर करतील.

दि. ५ रोजी सायंकाळी 7 वाजता अभिजित झुंजारराव दिग्दर्शित ‘गोष्टीच्या गोष्टीची गोष्‍ट’ हे मराठी नाटक सादर करतील ‘माची मोगी’ मोरजी. 6 रोजी सायंकाळी 7 वाजता तियात्र ‘चौकीदार’, ७ रोजी अंश थिएटर्स मुंबई ‘सर सर सरला’ हे हिंदी नाटक आणि 8 रोजी संध्याकाळी 7 वाजता इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अँड रिसर्च पुणेतर्फे प्रसाद वनारसे दिग्दर्शित इंग्रजी नाटक ‘फॉल अगेन फ्लाय बॅटर’ सादर करतील.

महोत्सवातील सर्व नाट्यप्रयोगांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. या बहुभाषिक नाट्यमहोत्सवात सर्व नाट्य कलावंत आणि संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन कला व संस्कृती खात्याने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT