Dragonfly Dainik Gomantak
गोवा

Dragonfly In Goa: गोव्यात चतुरांच्या प्रजातींमध्ये वाढ! रिसर्चमधून खुलासा; संवर्धनाची गरज

New dragonfly species discovered in Goa: अलीकडेच गोव्यात चतुर (ड्रॅगनफ्लाय)च्या काही नवीन प्रजाती समोर आल्या आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Dragonfly Hidden Species in Goa

Goa News: अलीकडेच पराग रांगणेकर यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या अनुसार गोवा हे १०८ चतुर (ड्रॅगनफ्लाय)च्या प्रजातींचे घर असल्याचे निदर्शनास आले, मात्र अधिकृतरीत्या गोवा हे ९६ चतुर (ड्रॅगनफ्लाय)च्या प्रजातींचे घर असल्याची नोंद आहे. निसर्गवादी पराग रांगणेकर WWF-India च्या सहकार्याने या जिवांचे दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

पराग रांगणेकर यांच्या मतानुसार राज्यात या प्रजातीबद्दल आणखीन संशोधन करण्याची गरज आहे, मात्र त्यांना या कामासाठी हवं तसं मनुष्यबळ मिळालेलं नाही. पराग रांगणेकर असेही सांगतात की वेगवेगळ्या वातावरणाला अनुसरून या प्रजातींचा शोध घेता येऊ शकतो. जास्तीत जास्त लोकांनी चतुर (ड्रॅगनफ्लाय)च्या प्रजातींबद्दल जाणून घ्यावं म्हणून ड्रॅगनफ्लाय फेस्टिव्हल गोव्यासह भारतातील 13 राज्यांमध्ये सुरू करण्यात आला आहे.

पैकी येत्या डिसेंबर महिन्यात पराग आणि WWF-India यांच्या मदतीने गोव्यातील झुऑलॉजीचे विद्यार्थी आणि १३ व्हॉलंटियर्स एकत्र येऊन नंदा आणि करमाळीच्या तलावावर अशा प्रजातींवर अभ्यास करून एक रिपोर्ट तयार करणार आहेत. चतुर (ड्रॅगनफ्लाय) हे गोव्यातील अनेक अपरिचित घटकांपैकी एक आहे आणि अशा अभ्यासामधून त्यांची माहिती जगासमोर येण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT