Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पंचायत प्रभागांचा फेररचना मसुदा लोकांच्या पाहणीसाठी खुला

गोव्यातील 186 पंचायतींच्या निवडणुका होणार

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील 186 पंचायतींची निवडणूक होणार असल्याने त्यासाठी पंचायत प्रभागांचा फेररचना मसुदा तयार करण्यात आला आहे. हा मसुदा संबंधित तालुक्यातील निवडणूक नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांच्या कार्यालयात 24 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत लोकांना तो पाहण्यासाठी तसेच त्यावर सूचना, सुधारणा तसेच दुरुस्ती करण्यासाठी खुला ठेवला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे (Election Commission) सचिव महादेव आरोंदेकर यांनी दिली.

आरोंदेकर यांनी बजावलेल्या सार्वजनिक नोटिशीत म्हटले आहे की, हा पंचायत प्रभाग मसुदा निवडणूक (Election) नोंदणी अधिकाऱ्यांनी तयार केला आहे. काही प्रभागांमध्ये समान मतदारांची संख्या असावी यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. हे प्रभाग फेररचनेचे काम गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून सुरू होते. त्यासाठी मामलेदार व संयुक्त मामलेदार यांची निवडणूक नोंदणी अधिकारी (ईआरओ) तर अव्वल कारकून व मुख्य कारकून (हेडक्लार्क) यांची साहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (एईआरओ) म्हणून नियुक्ती केली आहे.

याबरोबरच पंचायत निवडणुकीतील आरक्षण प्रक्रियेला गती मिळण्याचीही शक्यता आहे. यापूर्वी 2017 साली झालेल्या पंचायत निवडणुकीत 540 मतदारसंघ अनुसूचित जाती/जमाती तसेच इतर मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवले होते, शिवाय सर्वसाधारण प्रवर्गातील 323 प्रभागांसह 490 प्रभाग महिलांसाठी राखीव होते. एकूण 1450 प्रभागांसाठी निवडणूक झाली होती.

पंचायतींचा कार्यकाळ 20 मे रोजी संपुष्टात

या आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 186 पंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ येत्या 20 मेपर्यंत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पंचायत निवडणूक तयारी सुरू झाली आहे. पंचायत प्रभाग फेररचना मसुदा अंतिम झाल्यानंतर प्रभाग जाहीर केले जातील. त्यानंतर प्रभाग आरक्षण प्रक्रिया होणार आहे. या फेररचनेवेळी प्रभागाचे सीमांकन करताना सर्व नियम विचारात घेण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT