Industry in Goa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात नवा औद्योगिक धोरण मसुदा तयार

सूचना मागवल्या; येत्या विधानसभा अधिवेशनात मंजुरी

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्याच्या विकासासाठी उद्योगांचे योगदान मोठे असून राज्यात प्रदूषणमुक्त स्वच्छ उद्योग यावेत यासाठी राज्य सरकारने तयार केलेल्या गोवा औद्योगिक वाढ आणि गुंतवणूक प्रोत्साहन धोरण 2022 चा मसुदा येत्या अधिवेशनापर्यंत सर्वांसाठी खुला करण्यात येत आहे. त्यासाठी उद्योजक, नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. यावेळी गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड, सरव्यवस्थापक श्वेतिका, उद्योग सचिव कन्ना वेलू उपस्थित होते.

मंत्री  गुदिन्हो  पुढे म्हणाले की, नवीन औद्योगिक धोरण उद्योग वाढीला तसेच आयटी आणि पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन देणारे असून राज्यात गुंतवणूक वाढवणारे असेच आहे.

सिंगल विंडो क्लिअरन्स आणि एकच फॉर्म

उद्योगांच्या सोयीसाठी सिंगल विंडो क्लिअरन्स यंत्रणा आहे. मोठ्या उद्योगांना परवानग्या देण्यासाठी जास्तीत जास्त 3 महिने आणि छोट्या उद्योगांसाठी 2 महिन्यांचा कालावधी असेल. एकच अर्ज सर्व विभागांना पाठवला जाईल. जमीन वापरात बदल करण्यासाठी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाला अधिकार दिले जातील, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT