Goa Chief Secretary Dainik Gomantak
गोवा

Dr. V Candavelou: गोव्याच्या मुख्य सचिव पदावर आयएएस अधिकारी डॉ. व्ही. कँडवेलू यांची नियुक्ती

Goa Chief Secretary: 1997 बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. व्ही. कँडवेलू यांची गोव्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती

Akshata Chhatre

Goa Chief Secretary Dr. V Candavelou

गोवा: गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार 1997 बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. व्ही. कँडवेलू यांची गोव्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कँडवेलू यांनी 1991च्या बॅचचे AGMUT कॅडर आयएएस पुनीत कुमार गोयल यांच्याकडून गोव्याच्या मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला आहे तर आता पुनीत कुमार गोयल यांची राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगात बदली झाली आहे.

याव्यतिरिक्त 1995 बॅचचे AGMUT कॅडर आयएएस अधिकारी आणि अंदमानचे माजी मुख्य सचिव केशव चंद्र यांची नवी दिल्ली नगर परिषद (NDMC) चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये नरेश कुमार यांचा कार्यकाळ संपला होता आणि त्यानंतर आता यांच्या जागी चंद्रा यांची नियुक्ती झाली आहे.

या दोन मोठ्या सरकारी नियुक्त्यांनंतर लवकरच केंद्रात किंवा दिल्ली सरकारसोबत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची काही विशेष पदांवर नियुक्ती केली जाणार आहे, यामध्ये मिझोराम आणि अंदमानच्या मुख्य सचिव पदांसह इतर महत्त्वपूर्ण पोस्टिंग लवकरच केले जाण्याची शक्यता आहे.

केंद्रातून विविध सरकारी विभागांमध्ये 29 सहसचिवांची नियुक्ती करण्यात आलीये, ज्यामध्ये प्रामुख्याने भारतीय संरक्षण लेखा सेवा, इलेक्ट्रिकल अभियंत्यांची भारतीय रेल्वे सेवा आणि भारतीय महसूल सेवा यांचा समावेश होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT