Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa CM Pramod Sawant: प्रमोद सावंत यांच्या नावे रेकॉर्ड, घटकराज्य झाल्यानंतरचे ठरले पहिलेच मुख्यमंत्री

Goa CM Pramod Sawant: स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी संभाळली.

Pramod Yadav

Goa CM Dr. Pramod Sawant Two Terms Five Years

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावे नवा रेकॉर्ड नोंद झाला आहे. सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची पाच वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली असून, गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर सलग पाच वर्षे पूर्ण करणारे सावंत पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत.

स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी संभाळली.

मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले, त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 19 मार्च 2019 डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सुत्रे सोपविण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 20 जागा जिंकल्या.

28 मार्च 2022 रोजी प्रमोद सावंत यांनी दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सावंत यांनी सलग पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पूर्ण केला आहे. गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर असा रेकॉर्ड करणारे सावंत पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत.

सावंत मुख्यमंत्री पदाची सलग पाच वर्षे पूर्ण करणारे भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

मुख्यमंत्री म्हणून कोणाचा किती कार्यकाळ?

1) दयानंद बांदोडकर

दोनवेळा मुख्यमंत्री एकूण नऊ वर्षांचा कार्यकाळ

2) शशिकला काकोडकर

दोनवेळा मुख्यमंत्री एकूण पाच वर्ष कार्यकाळ

3) प्रतापसिंह राणे

सातवेळा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी, एकूण 15 वर्ष

4) मनोहर पर्रीकर

चारवेळा मुख्यमंत्री एकूण आठ वर्ष कार्यकाळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT