10 कोटींची देणगी! विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्यातील राजकीय पक्षांना मिळाले इलेक्टोरल बॉन्ड्सद्वारे पैसे

Electoral Bond Details From Goa: गोव्यात 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांना निवडणूक रोखेच्या माध्यमातून दहा कोटी रुपये मिळाले आहेत.
Electoral Bond Details From Goa Fund Received
Electoral Bond Details From Goa Fund ReceivedDainik Gomantak

Electoral Bond Details From Goa Fund Received

देशात सध्या निवडणूक रोखेच्या माध्यमातून राजकीय पक्षांना मिळालेल्या देणगीचा विषय गाजत आहे. गोव्यात 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांना निवडणूक रोखेच्या माध्यमातून दहा कोटी रुपये मिळाले आहेत.

यामध्ये राज्यातील नामांकित व्यावसायिक आणि कॅसिनो व्यावसायिकांचा समावेश आहे. तसेच, देणगीचा लाभ मिळालेल्या पक्षांमध्ये प्रादेशिक पक्ष गोवा फॉरवर्ड आणि मगोचा देखील समावेश आहे.

गोव्यातील नामांकित व्यावसायिक साळगावकर, धेंपो, चौगुले आणि काही कॅसिनो कंपन्यांनी सुमारे दहा कोटी रुपयांची देणगी राजकीय पक्षांना दिली आहे. प्रामुख्याने 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देणगी दिल्याचे समोर आले आहे.

निवडणूक रोखेच्या माध्यमातून भाजपला किती पैसे मिळाले याचा तपशील दिला नसला तरी महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांनी 2019 पासून त्यांना देणगी मिळत असल्याचा खुलासा केला आहे.

दत्तराज साळगावकर यांच्या मालकीची व्ही एम साळगावकर कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड ही सर्वात मोठी देणगीदार कंपनी आहे. कंपनीने 4.5 कोटी रुपयांची देणगी दिली असून, धेंम्पोने 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 2.4 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

Electoral Bond Details From Goa Fund Received
Electoral Bonds: 11 दिवसांत 3300 हून अधिक इलेक्टोरल बाँड्स विकले गेले; SBI ने प्रतिज्ञापत्र दाखल करुन SC ला कळवले

शिपिंगपासून ते ऑटोमोबाईल डीलरशिप क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या चौगुले आणि कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देणगी दिलीय. कंपनीने दोन टप्प्यांत 2 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले, पहिले जानेवारी 2022 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतर एप्रिल 2022 मध्ये भाजपने सरकार स्थापन झाल्यानंतर दुसऱ्यांदा खरेदी केले.

व्हीएम साळगावकर आणि ब्रदर प्रायव्हेट लिमिटेड, शिवानंद साळगावकर समूहाची कंपनी असून खाणकाम, जहाजबांधणी आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीने जानेवारी 2022 मध्ये 1.25 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले.

गोव्यातील सर्वात नामांकित कंत्राटदारांपैकी एक असलेल्या MVR समूहाचे अध्यक्ष मुप्पाना व्यंकट राव यांनी देखील जुलै 2023 मध्ये प्रत्येकी 45 लाख रुपयांच्या दोन टप्प्यांत 90 लाख रुपयांचे रोखे खरेदी केले.

Electoral Bond Details From Goa Fund Received
Electoral Bonds To Parties In Goa: गोव्यातील दोन प्रादेशिक पक्षांना इलेक्टोरल बॉन्ड्समधून मिळालेत 90 लाख रुपये

डेल्टिन ब्रँड अंतर्गत कॅसिनो चालवणाऱ्या डेल्टा कॉर्पने उपकंपनी Highstreet Cruises and Entertainment Pvt Ltd मार्फत एप्रिल 2019 मध्ये 40 लाख रुपये दान केले.

विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्डला नोव्हेंबर 2018 मध्ये प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून 50 लाख रुपये मिळाले होते. याकाळात पक्षाचे तीनही सदस्य मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. 12 जानेवारी 2021 रोजी पक्षाला 35 लाख रुपये मिळाल्याचा खुलासा खुलासा त्यांनी केला.

महाराष्ट्र गोमन्तक पक्षाला 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, शिवानंद साळगावकर ग्रुप कंपनीकडून 35 लाख रुपयांचे रोखे मिळाले आणि जानेवारीमध्ये VS Dempo आणि Co Pvt Ltd कडून आणखी 20 लाख रुपयांचे रोखे मिळाले.

तसेच, गोवा काँग्रेसला शिवानंद साळगावकर ग्रुप कंपनीकडून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येकी 1 लाख रुपये किमतीचे 30 इलेक्टोरल बाँड मिळाल्याचे त्यांनी उघड केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com