Triathlon in National Games Dainik Gomantak
गोवा

Road Closed for Triathlon: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ट्रायथलॉन खेळासाठी पणजीतील वाहतूक मार्गात बदल

उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांची माहिती

Kavya Powar

Road Closed for Triathlon in National Games from 4 to 7 November

सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याची विक्रमी वाटचाल सुरू आहे. यातच आजपासून होणाऱ्या ट्रायथलॉन खेळ प्रकारातही राज्यातील खेळाडू विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर 4 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर मिरामार- करंजाळे मार्ग बंद करण्यात येणार असल्याची माहिती उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिली आहे.

आजपासून 7 तारखेपर्यंत सकाळी चार वाजल्यापासून मिरामार सर्कल ते आयवाव जंक्शन मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रहिवाशांच्या सोयीसाठी डॉ. जॅक दे सिक्वेरा मार्गावरील पीस हेवन स्कूल जंक्शनपासून आयवाव जंक्शनपर्यंतची कार लेन वापरता येणार आहे

ट्रायथलॉन स्पर्धेमुळे अनेक मार्ग वळवण्यात आले आहेत. त्यामुळे पणजीतून दोनापावला-करंजाळेच्या दिशेने जाणाऱ्यांना DBB मार्गावरून टोंक-आदर्श सर्कलपासून पुढे ओल्ड करंजाळे मार्गाद्वारे जाता येणार आहे. (Road Closed for Triathlon in National Games)

तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) जंक्शन ते पणजीच्या दिशेने जाताना आयवाव जंक्शन ते ओल्ड करंजाळेतील अंतर्गत रस्त्यावरून हॉटेल गोवा इंटरनॅशनल कडून मिरामार सर्कलपर्यंत मार्ग वळवण्यात आला आहे.

जरी मार्ग बंद किंवा वळवण्यात आले असले तरी आपत्ती सेवा पुरवणाऱ्या म्हणजेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना कोणतेही निर्बंध लागू केलेले नाहीत.

सार्वजनिक बसेससुद्धा वळवलेल्या मार्गांवरूनच जातील. दरम्यान जे मार्ग वाहतुकीसाठी वळवण्यात आले आहेत आणि ज्या मार्गावर ट्रायथलॉन क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या दोन्हीही मार्गांवर कोणत्याही प्रकारची पार्किंग सुविधा असणार नाही. तसेच या मार्गांवर कोणत्याही वाहनांनी थांबू नये, अशी माहिती देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT