Dr. Deviya Rane in Parye Dainik Gomantak
गोवा

Sattari : पूर प्रतिबंधक उपायांकडे सरकारचे लक्ष : आमदार डॉ. दिव्या राणे

पर्ये येथे उभारणार पूर प्रतिबंधक संरक्षक भिंत

दैनिक गोमन्तक डिजिटल

पावसाळ्यात पूरसदृश स्थितीचा नागरिकांना सामना करावा लागू नये यासाठी पूर प्रतिबंधक उपाययोजनांकडे सरकारचे विशेष लक्ष आहे. त्यासाठी जलसिंचन खात्यातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी पूर प्रतिबंधक संरक्षक भिंतींची उभारणी करण्यात येणार आहे.

आपत्कालीन व्यवस्थापन या अंतर्गत जलसिंचन खात्यातर्फे नागरिकांना शक्य त्या प्रमाणात सुरक्षा निर्माण व्हावी यासाठी सरकारतर्फे सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन आमदार डॉ. दिव्या राणे यांनी दिले.

पर्ये - सत्तरी येथे सुमारे 86 लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या पूर प्रतिबंधक संरक्षक भिंतीच्या भूमिपूजन सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी जलसिंचन खात्याचे साहाय्यक अभियंता कमलाकांत माजीक, पर्ये पंचायतीच्या सरपंच रती गावकर, उपसरपंच आत्माराम शेट्टी, दीपा नाईक, दत्ता राणे, हेमंत राणे, अमिषा गावकर, उमेश राणे, लक्ष्मीकांत शिरोडकर उपस्थित होते.

आमदार राणे पुढे म्हणाल्या, की पूर प्रतिबंधक संरक्षण भिंतीची उभारणी करण्यात यावी यासंदर्भाचा प्रस्ताव जलसिंचन खात्याला सादर करण्यात आल्यानंतर जलसिंचन खात्याचे प्रमुख अभियंता प्रमोद बदामी व मंत्री सुभाष शिरोडकर यांनी त्वरित या प्रस्तावाला मान्यता दिली. सुमारे 86 लाख रुपये खर्चून ही संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन

साहाय्यक अभियंता कमलाकांत माजीक यांनी सांगितले, की पावसाळ्यात या भागामध्ये पूरस्थिती निर्माण होत असते. मोठ्या प्रमाणात पाऊस लागल्यानंतर वाळवंटी नदीचे पात्र ओसंडून वाहते. यामुळे या ठिकाणी पूर्ण प्रतिबंधक संरक्षक भिंत उभारण्यात यावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती.

यासाठी आमदार डॉ. दिव्या राणे यांनी विशेष लक्ष दिल्यामुळे याला मान्यता मिळाली. सुमारे १६० मीटर लांब व अडीच मीटर उंच पूर संरक्षक भिंतींची उभारणी करण्यात येणार आहे. हे काम शक्य तेवढ्या लवकर पूर्ण व्हावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Gemstones: ग्रहांच्या 'बॅटिंग'वर तुम्ही मारणार सिक्सर! कामात फोकस आणि नफ्यात वाढ देणारी 5 लकी रत्ने; करिअरच्या मैदानात आता तुम्हीच ठरणार मॅन ऑफ द मॅच

मोपा विमानतळावर 3.16 कोटींचे अमली पदार्थ जप्त; आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

जिवंत जाळलं, गोळ्या झाडल्या अन् आता विष पाजलं! कट्टरतावाद्यांनी घेतला जॉय महापात्रोचा जीव; बांगलादेशात हिंदूंच्या क्रूर हत्यांचं सत्र सुरुच

कोकण रेल्वेची मोठी कारवाई! 2025 मध्ये विनातिकीट प्रवाशांकडून 20.27 कोटींचा दंड वसूल

Plane Crash: ओडिशात विमान अपघात! राउरकेला-भुवनेश्वर चार्टर्ड विमान कोसळलं; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, 6 जखमी

SCROLL FOR NEXT