CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: सावली झुगारली, मेहनतीने उमटवला ठसा!

CM Pramod Sawant: डॉ. सावंत ठरले सलग पाच वर्षे पूर्ण करणारे भाजपचे गोव्यातील पहिले मुख्यमंत्री

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant:

डॉ. प्रमोद सावंत हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाची सलग पाच वर्षे पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही नेत्याच्या शैलीची आपल्यावर छाया पडू न देण्याची काळजी घेत, राजकारणासह समांतर समाजोन्‍नतीचे कार्यक्रम राबवणारे मुख्‍यमंत्री म्‍हणून त्‍यांनी विशेष ठसा उमटवलाय. 19 मार्च 2019 रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

स्व. मनोहर पर्रीकर यांनाही मुख्यमंत्रिपदाची सलग पाच वर्षे कधी पूर्ण करता आली नाहीत. पर्रीकर यांनी चार वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे त्यांना 17 मार्च 2019 रोजी इहलोकाची यात्रा संपवावी लागली होती. त्‍यानंतर डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम शपथ घेतली तेव्हा परिस्थिती सर्वार्थाने प्रतिकूल होती.

मनोहर पर्रीकर हेच मुख्यमंत्रिपदी असतील असे गृहीत धरून राजकीय आखणी, बांधणी करण्यात आली होती. ती राजकीय कोंडी फोडण्यासाठी तत्‍कालीन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेसचे दहा आणि मगोच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये येण्यास सुकर असे वातावरण तयार केले.

त्‍यांनी मुख्यमंत्रिपदाचा ताबा घेण्याआधी दीड वर्षे प्रशासन कोलमडलेले होते. आर्थिक प्रश्‍‍न आ वासून उभे होते. लोकांच्या अनेक मागण्या प्रलंबित होत्या. डॉ. सावंत हे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना मंत्री म्हणूनही काम करण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे

मात्र, संथपणे पण दमदार पावले टाकत राजकीय आखाड्यात मुख्यमंत्र्यांनी असे डावपेच टाकले की भले-भले चीतपट झाले. काम करण्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. आजवर कोणत्याही मुख्यमंत्र्याने राज्य स्वयंपूर्ण असले पाहिजे असा विचार जनमानसात रुजवला नव्हता.

प्रादेशिक अस्‍मितेला प्राधान्‍य दिले होते. ते काम जाणीवपूर्वक सावंत यांनी केले. सुरूवातीला त्यांच्या या कार्यक्रमाची फारशी दखल घेतली गेली नाही. आता तो विचार गावागावांत रुजला आणि गोवा स्वयंपूर्ण होऊ शकतो, असे सगळ्यांनाच वाटू लागले आहे.

निर्माण केले स्‍वत:चे अस्तित्व

कुठेही त्रागा करायचा नाही, कितीही अवघड काम असले तरी ते सोडवण्याचा संयमाने मार्ग शोधायचा, ही मुख्यमंत्र्यांची खासियत. पर्रीकर हे राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरील मोठे नाव. त्यामुळे त्यांचे नाव काढल्याशिवाय भाजपचे पानही हलत नसे. पदोपदी आज भाई असते तर, अशी तुलना व्‍हायची. त्‍यामुळे सावंत यांना आपली मळली वाट निर्माण करणे कठीण दिसत होते. त्यांनी सुरूवातीला पर्रीकर यांची प्रतिमा शेजारील खुर्चीवर ठेवून प्रशासनाचा श्रीगणेशा केल, पण नंतर आपल्याच कामगिरीने सारा अवकाश व्यापला. त्‍यामुळे तुलना होणे बंद झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT