Dr. Babasaheb Ambedkar's political use from congress  Dainik Gomantak
गोवा

'काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय वापर'

सतीश धोंड यांचा आरोप; भाजप मेळाव्यात विजयी आमदारांचा सत्कार

दैनिक गोमन्तक

पणजी: समता आणि बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने केवळ राजकीय वापर केला. शेवटी त्यांनी भारतीय बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला नाही. जर त्यांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला असता, तर भारतात नवा पाकिस्तान जन्माला आला असता, असे प्रतिपादन भाजपचे संघटन सरचिटणीस सतीश धोंड यांनी केले.

पणजीत पक्षाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभ आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्ते आणि आमदारांची शाळाच घेतली. भाजपने गोव्यात ऐतिहासिक विजय मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर आज मंडल अध्यक्ष, गट अध्यक्ष, बूथ अध्यक्ष, आमदार, मंत्री यांचा कार्यकर्ता मेळावा पणजीत आयोजित केला होता.

कार्यक्रमाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह मंत्री, पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्याने मुख्यमंत्र्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच भाजपच्या इतर नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला.

सरचिटणीस धोंड यांनी कार्यकर्ते आणि आमदारांची शाळा घेत पक्ष आणि आमदार यांनी एकत्र काम करण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी भविष्यातील कार्यक्रम नियोजनही दिले. 6 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत भाजपच्यावतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यापुढच्या काळात पक्ष संघटन आणि सरकार यांच्या मदतीने सामान्यांचा विकास करण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले.

‘विकासकामांमुळेच भाजपला सत्ता’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की गेल्या दहा वर्षांत भाजपने केलेल्या विकासकामांच्या आधारावर भाजपला पुन्हा सत्ता मिळाली आहे. अंत्योदय पद्धतीने सरकार कार्यरत असेल. त्यामुळे येणाऱ्या पंचायत आणि लोकसभेच्या निवडणुका भाजप मोठ्या फरकाने जिंकेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT