गोव्यात पहिल्याच दिवशी 640 वाहनचालकांवर कारवाई

नवीन मोटार वाहन कायद्याची अमलबजावणी, तब्बल 3.80 लाखांचा दंड वसूल
Goa Police
Goa Police Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : पहिल्याच दिवशी गोव्यात नवा मोटार वाहन कायदा मोडल्याप्रकरणी 640 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2022 पासून गोव्यात नवीन मोटार वाहन कायद्याची काटेकोर अमलबजावणी सुरु झाली आहे. एका दिवसात 640 वाहनचालकांकडून तब्बल 3.70 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

गोव्यात नवीन मोटार वाहन कायदा लागू केल्यामुळे अपघातांमध्ये घट होईल आणि मोठ्या दंडाच्या रकमेमुळे वाहनचालक वाहतुकीचे नियम पाणतील असा विश्वास दक्षिण गोवा वाहतूक पोलिसांचे उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी व्यक्त केला होता. कायद्याचं पालन करत वाहन चालवल्यास कोणतीही कारवाई होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. वाढलेले अपघात आणि रस्ते सुरक्षिततेसाठी हा कायदा गोव्यात लागू करणं गरजेचं होतं, असंही आंगले म्हणाले.

दंडाच्या रकमेच्या भीतीने वाहनचालक आता शिस्तीने आणि काळजीपूर्वक वाहन चालवतील. जे बेफिकीरपणे गाडी चालवत असत तेही आता कायद्याच्या धाकाने सुरक्षित गाडी चालवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसंच कागदपत्र घेऊन प्रवास करतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. वाहन चालवण्याच्या परवान्याशिवाय गाडी चालवण्यासाठी 10 हजारांचा दंड खूप जास्त असल्याचं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे. मात्र परवाना नसेल तर तो चालक रस्त्यावर येण्यास घातक असल्याने त्याच्यावर दंडाची तरतूद योग्यच असल्याचं आंगले यांचं म्हणणं आहे.

Goa Police
इंधन दरवाढीनंतर 'गोव्यात' दुधाचे ही दर वाढले

दंडाची रक्कम ही इतर नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करत लागू केल्याचं धर्मेश आंगले यांनी स्पष्ट केलं. पोलिसांच्या हातात असलेली मशिन 1 एप्रिल रोजी अपडेट झालेली आहेत. त्यामुळे पोलिसांकडून (Police) कायद्याचीच अमलबजावणी सुरु आहे. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं. दंडाची रक्कम कैकपटींनी जास्त असल्याने वाहनचालकांची काही ठिकाणी पोलिसांशी वादावादी झाल्याचं समोर आलं आहे.

Goa Police
गोमेकॉ इस्पितळ परिसरात साचले कचऱ्याचे ढीग

गोवा सरकारने (Goa Government) मोटर वाहन कायदा 1998 मधील तरतुदींमध्ये जुलै 2021 मध्ये बदल केले होते. आता या नव्या तरतुदींची अमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून गोव्यात केली जाणार आहे. नवी दंडाची रक्कम ही सध्याच्या रकमेपेक्षा दहापटींनी जास्त असल्याने नियम मोडल्यास वाहनचालकांना भरभक्कम दंड भरावा लागणार आहे. चालकाने वैध परवान्याशिवाय गाडी चालवल्यास किंवा परवाना नसलेली गाडी चालवल्यास तब्बल 10 हजार रुपयांचा दंड (Penalty) आकारला जाईल. तर रजिस्ट्रेशन न झालेली किंवा विमा नसलेली गाडी चालवल्यास 2000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वेगाने गाडी चालवणे, सीट बेल्ट न वापरणे, गाडी चालवताना इतरांचा जीव धोक्यात घालणे असे प्रकार निदर्शनास आल्यास त्याला 1000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसंच ट्रिपल सीट आणि विनाहेल्मेट दुचाकीवरुन फिरल्यास 1000 रुपये दंड आणि परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com