Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary Dainik Gomantak
गोवा

Ambedkar Jayanti 2023 : आंबेडकरांचे कार्य तरुणांपर्यत पोहचावे - डॉ. दिव्या राणे

आमदार दिव्या राणे : पर्ये भाजपतर्फे पिसुर्लेत जयंती

गोमन्तक डिजिटल टीम

पिसुर्ले : प्रतिकूल स्थितीतही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महान मानवतावादी कार्याची माहिती आताच्या तरुण पिढीपर्यंत पोचणे आवश्यक आहे. म्हणूनच भाजपतर्फे आज देशभर या महापुरुषाची जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यांनी साकारलेल्या संविधानामुळे आज देशात समता प्रस्थापित झाली आहे, याचा लाभ लोकशाही बळकट होण्यासाठी झाला आहे, असे प्रतिपादन पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केले. पिसुर्ले येथे आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर पिसुर्लेचे सरपंच देवानंद परब, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, पर्ये भाजप संघटक विनोद शिंदे, भिरोंडा पंचायतीचे सरपंच उदयसिंह राणे, दिपाजी राणे, पिसुर्ले पंचायतीचे सर्व पंच सभासद उपस्थित होते.

आमदार दिव्या राणे म्हणाल्या की, डॉ.आंबेडकर यांच्या कार्याचा विसर पडता कामा नये, त्यासाठी त्यांच्या कार्याची माहिती देण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले पाहिजे, त्यांच्या कडे असलेल्या दुरदृष्टीतून साकारलेल्या संविधान अर्थात घटनेचे आजही पालन केले जाते, ही चांगली बाब आहे.

त्यामुळे आज समाजातील प्रत्येक घटकांनी त्यांच्या कार्याचे अनुकरण केले पाहिजे. त्यासाठी तरूण पिढीने उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त करून आपला गाव पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी सगुण वाडकर यांनीही मार्गदर्शन केले. सरपंच देवानंद परब यांनी स्वागत केले. अशोक नाईक यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT