Law Degree Admission Process Controversy Canava
गोवा

Law Degree Admission: कायदा पदवी प्रवेशात काळेबेरे असल्‍याचा संशय; पालक संतप्‍त

Admission Process Controversy : प्रवेश प्रक्रियेवरुन सलग दुसऱ्या वर्षी घोळ

गोमन्तक डिजिटल टीम

कायदा पदवी अभ्यासक्रम प्रवेशाचा सलग दुसऱ्या वर्षी घोळ झाला आहे. कोणत्या महाविद्यालयात कोणत्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला, याची यादी जाहीर न केल्याने प्रवेशात काही तरी काळेबेरे असल्याचा संशय प्रतीक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना वाटू लागला आहे.

मडगाव येथील कारे महाविद्यालयात बीएएलएलबी या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी ६० विद्यार्थ्याना प्रवेश दिला जातो, तर मिरामारच्या साळगावकर महाविद्यालयात १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

यासाठी १३ मेपर्यंत उच्च शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून अर्ज मागवण्यात आले होते. २५ मे रोजी परीक्षा घेतली गेली. आता महिना होत आला तरी निकाल जाहीर न झाल्याने पालकांत त्याविषयी चर्चा सुरू झाली होती. गेल्याच वर्षी प्रवेशावेळी घोळ झाला होता, त्यामुळे यंदाही घोळ घातला जाणार असे अनेकांना वाटत होते.

अखेर काल या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. १८० जणांची प्रवेशासाठी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली, मात्र त्यात कोणत्या विद्यार्थ्याची कोणत्या महाविद्यालयात निवड झाली याची माहिती दिली गेली नाही. शिवाय १८२ जणांची लांबलचक प्रतीक्षा यादीही तयार करण्यात आली होती.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना डावलले

या प्रतीक्षा यादीवरील विद्यार्थ्यांच्या पालकांनी विचारणा केल्यावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे कळवण्यात आले आहे आणि सर्व जागा भरल्या आहेत असे सांगण्यात आले आहे. यामुळे कोणत्या महाविद्यालयात कोणत्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, त्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर करावे असे पालकांना वाटते.

प्रतीक्षा यादीवरील विद्यार्थ्यांना डावलून या अभ्यासक्रमाच्या जागा भरण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT