Tax |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News:...यामुळे नव्या आयकर प्रणालीचा राज्याला दुप्पट लाभ

व्यावसायिकांसाठी केंद्र सरकारने नवी आयकर प्रणाली सुरू केली असली तरी कर कायदा 1961 कलम 5-ए नुसार राज्यातील पती-पत्नीला स्वतंत्रपणे लाभ घेता येईल. त्यामुळे हा लाभ दुप्पट असेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Goa News: देशातील व्यावसायिकांसाठी केंद्र सरकारने नवी आयकर प्रणाली सुरू केली असली तरी कर कायदा 1961 कलम 5-ए नुसार या नव्या करप्रणालीनुसार राज्यातील पती-पत्नीला स्वतंत्रपणे लाभ घेता येईल. त्यामुळे हा लाभ दुप्पट असेल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दयानंद सोपटे, गिरीराज वेर्णेकर, पक्षाच्या चार्टर्ड अकाऊंटंट विभागाचे निमंत्रक जयराम खोलकर उपस्थित होते.

तानावडे म्हणाले की, नव्या अर्थसंकल्पानुसार केंद्र सरकारने नवी कर प्रणाली सुरू केली आहे. मात्र, सध्या नव्या आणि जुन्या दोन्हीही करप्रणालींचा लाभ घेता येणार आहे. राज्यात कर कायदा 1961 कलम 5 नुसार पती-पत्नी स्वतंत्रपणे कर निवेदन भरून करामध्ये सवलत मिळवू शकतात. एक प्रकारे हा राज्यासाठी दुप्पट फायदा आहे.

मात्र, याचा लाभ नोकरदार कुटुंबांना होणार नाही. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मत्स्यसंपदा योजनेचा राज्यातील मच्छीमारांना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय कर स्लॅब वाढवल्याने याचा नोकरदारांना लाभ होणार आहे.

महिला, तरुण व्यावसायिकांनाही भांडवली गुंतवणूक, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्टार्टअप योजनेचा लाभ घेता येईल. राष्ट्रीय महामार्ग, अटल सेतू, झुवारी पूल, मोपा विमानतळ, आयुष इस्पितळ याचा लाभ लोकांना मिळत आहे, असेही तानावडे म्हणाले.

‘त्या’ निधीचा म्हादईवर परिणाम नाही

अर्थसंकल्पामध्ये कर्नाटकच्या सिंचन प्रकल्पांसाठी केलेल्या 5,300 कोटींच्या विशेष निधीबाबत तानावडे म्हणाले की, हा निधी म्हादईसाठीचा नसून तो भद्रा सिंचन प्रकल्प आणि पाणी पुरवठ्यासाठी आहे. त्यामुळे त्याचा परिणाम या प्रकल्पावर होणार नाही. सरकार म्हादईबाबतची न्यायालयीन लढाई जोमाने सुरू ठेवणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

SCROLL FOR NEXT