Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: वाहतूक कोंडीचा त्रास सोसेना..

आणखी 15 दिवस परीक्षा : खड्डे बुजविण्याचे काम सुरू, वाढला ताण

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Smart City पणजीत वाहतूक कोंडीमुळे नागरिक प्रचंड वैतागलेले आहेत. वाहनचालकांना आणखी पंधरा दिवस हा त्रास सोसावा लागणार, असे सध्यातरी चित्र आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ज्या मलनिस्सारणाच्या वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे, ते काम 50 टक्क्यांवर पूर्ण होत आले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी वाहिन्यांचे चेंबर काढण्यात आले आहेत, त्या ठिकाणचे चेंबर बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर तत्काळ डांबरीकरण करण्यात येईल.

‘जी-२०’ च्या गोव्यात होणाऱ्या बैठकांमुळे राजधानीतील सुरू असलेली कामे ‘जैसे थे’ ठेवून रस्त्यावर डांबरीकरण केले जाणार आहे. त्यातच आता महसूल मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी 31 मार्चपर्यंत कामे होतील, असे सांगितल्याने पूर्वीच्या 15 मार्चच्या मुदतीपेक्षा आणखी 16 दिवस काम करण्यास संबंधित यंत्रणेला मिळाले आहेत.

या सर्व कामांचा ताण चांगल्या वाहतुकीस योग्य असणाऱ्या रस्त्यांवर पडलेला आहे. सध्या दोन्ही बाजूने वाहनांचे पार्किंग ज्या-त्या रस्त्यावर दिसत आहे. अनेक ठिकाणी अवजड वाहने ये-जा करीत असल्याने वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत.

बांदोडकर मार्गावर वाहनांना ‘ब्रेक’:-

‘जी-२०‘ बैठकीमुळे बांदोडकर मार्गावर डांबरीकरण करण्यात येत आहे. त्याशिवाय कला अकादमीपासून विद्युत भवनापर्यंतच्या मार्गापर्यंत रस्ता दुभाजकाचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणारी वाहतूक किंवा येणारी वाहतूक अधून-मधून वळविली जात आहे.

शहरातील अनेक रस्ते खोदलेले आहेत, त्यातच आणखी 18 जून मार्गावर सकाळी, दुपारी आणि सायंकाळी वाहनांची गर्दी होते, त्यामुळे अनेकजण शहराबाहेर पडण्यासाठी बांदोडकर मार्गाचा वापर करतात.

आजही सकाळी असाच प्रकार दिसून आला, त्यावेळी पुन्हा एकदा वाहतूक कोंडी दिसून आली. वाहतूक पोलिस असले तरी वाहतुकीचे नियोजन करण्यात पोलिसांच्या वाहतूक खात्याला अपयश आल्याचे दिसते.

खाऱ्या पाण्याचा बांधकामासाठी वापर

सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सुरु असलेल्या कामासाठी खाऱ्या पाण्याचा वापर होतानाचा एक व्हिडिओ व्हायरला झाला असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. खाऱ्यापाण्याचा वापर बांधकामासाठी जर होत असेल तर ते धोकादायक आहे. या प्रकाराची चौकशी करुन खात्याने तत्काळ असे काम थांबवावे, अशी मागणी होत आहे.

पेव्हर्सवरही डांबरीकरण सुरू

सध्या शहरातील रस्ते जागोजागी खोदलेले आहेत. अपघातांचा धोकाही वाढलेला आहे. रत्यांवरील काही पेव्हर्सही उघडे असल्याच्या स्थितीत आहेत. ज्या भागाचे डांबरीकरण करण्यात येत आहे तेथे असलेल्या पेव्हर्सवर डांबरीकरण करण्याचा प्रकार सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला जोरदार धडक, 4 मुलांसह 6 जण गंभीर जखमी

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

SCROLL FOR NEXT