South Goa MP Viriato Fernandes Criticizes Central Government Dainik Gomantak
गोवा

Parliament Session: संसदेत पहिल्यांदाच बोलले दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो, ज्वलंत मुद्यावर सरकारला धरले धारेवर

South Goa MP Viriato Fernandes Criticizes Central Government: दक्षिण गोव्याचे कॉंग्रेसचे खासदार विरियातो फर्नांडिस लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच संसदेत बोलले.

Manish Jadhav

संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान आज (22 जुलै) दक्षिण गोव्याचे कॉंग्रेसचे खासदार विरियातो फर्नांडिस (South Goa MP Viriato Fernandes) लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच संसदेत बोलले. यावेळी त्यांनी दक्षिण गोव्याचे प्रतिनिधित्व करताना गोव्याला कोल बनवू नका म्हणत विरियातो यांनी थेट केंद्र सरकारवर हल्ला चढवला.

विरियातो यांनी लोकसभेत बोलताना आपल्या भाषणातून केंद्र सरकारचा (Central Government) चांगलाच समाचार घेतला. त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. गोव्याला कोल हबमध्ये रुपांतर करु नका, म्हणत विरियातो यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. त्यांनी राज्यातील पर्यटनाचा नाश करणाऱ्या प्रकल्पाची सक्ती केल्याबद्दल सरकारवर सडकून टीका केला.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातून भाजपच्या (BJP) उमेदवार पल्लवी धेंपो यांना पराभूत करत कॉंग्रेसच्या विरियातो फर्नांडिस यांनी शानदार विजय नोंदवला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात खूप घमासान पाहायला मिळाले होते. संविधानाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विरियातो यांना मोठ्या टीकेचा सामना करावा लागला. परंतु अखेर विरियातो यांनी दक्षिण गोव्यातून बाजी मारत लोकसभा गाठलीच.

संविधानाबाबतच्या वक्तव्यावरुन टीकेचा सामना

भारतीय संविधान गोव्यावर जबदस्ती लादलं, असं म्हणत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी राळ उडवून दिली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर गोव्यात मोठा वादंग निर्माण झाला होता.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरियातो यांच्यासह काँग्रेसवर हल्ला चढवला होता. काँग्रेसने गोवा मुक्तीसाठी 14 वर्षे विलंब केला. आता त्यांचा उमेदवार भारतीय संविधानाची पायमल्ली करण्याचे धाडस करतोय? अशा शब्दात सावंत यांनी टीका केली.

एवढ्यावरच न थांबता भाजपकडून विरियातो यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. विरियातो यांनी संविधानाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांची उमेदवारी बाद करण्यात यावी अशी भाजपकडून मागणी करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT