Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

'मुख्यमंत्र्यांचा भाऊ, PA सांगणाऱ्या व्यक्तीला बळी पडू नका', मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्र्यांचा भाऊ असल्याचे सांगत क्लबमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतयाला अटक

गोमन्तक डिजिटल टीम

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांचा भाऊ, स्वीय सहाय्यक (PA) आहे असे सांगणाऱ्या फसव्या व्यक्ती किंवा फोन कॉलला बळी पडू नका. असे आवाहन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला केले आहे. अशा व्यक्ती किंवा फेक कॉल (Fake Call) विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी सूचना देखील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांनी केली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्र्याचा भाऊ असल्याचे सांगत क्लबमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, मी संबधित यंत्रणांना अशी फसवणूक करणाऱ्यांबाबत माहिती दिली आहे. तसेच, अशी फसवणूक करणाऱ्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी. राज्यातील जनतेने देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा भाऊ, स्वीय सहाय्यक किंवा विशेष अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या फसव्या व्यक्तीच्या कोणत्याचा आमिषाला बळी पडू नये. असे कोणी सांगत असल्यास मुख्यमंत्री कार्यलयाशी याची एकदा खातरजमा करावी. तसेच, याप्रकरणी मी तक्रार दाखल केली असून, पोलिसांना कडक कारवाई करण्याची सूचना केली आहे.

मुख्यमंत्र्यांचा भाऊ असल्याचे सांगत क्लबमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतयाला अटक

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा भाऊ असल्याचे सांगत एल.पी.के क्लबमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतयाला पोलिसांनी अटक केली आहे. अज्ञात व्यक्तीने प्रमोद सावंत यांचा भाऊ असल्याचे सांगत जबरदस्तीने क्लबमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांनाही आला होता बोगस फोन कॉल

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांना देखील आठ दिवसांपूर्वी एक बोगस फोन आला होता. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या या फोनवर संबधित व्यक्तीने केंद्रीय कायदा मंत्रालयाकडून बोलत असल्याचा दावा करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी पर्वरी पोलिसांना (Porvorim Police) माहिती दिली. पर्वरी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून, याही प्रकरणाचा पोलिस तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: यॉर्कर किंगचा नवा कारनामा! मलिंगाचा रेकॉर्ड मोडत बुमराह ठरला 'बोल्ड'चा बादशाह; द. आफ्रिकेविरुद्ध केली कमाल VIDEO

VIDEO: जस्सी 'जैसा' कोई नही! क्विंटन डिकॉकला केलं चारीमुंड्या चित, धाकड गोलंदाजीनं केलं क्लीन बोल्ड; व्हिडिओ व्हायरल

सत्तरीत अवकाळी पावसाचा तडाखा! अचानक कोसळलेल्या सरींनी काजू उत्पादकांचे धाबे दणाणले; उत्पादन घटण्याची भीती

T20 WC 2026: टीम इंडियासाठी 'करो या मरो'! सेमीफायनल गाठण्यासाठी कसं आहे समीकरण? भारताचा हा 'मास्टर प्लॅन'; पाहा संपूर्ण रोडमॅप

Holi 2026 Horoscope: होळीला ग्रहांचं महामिलन! शुक्र-शनीची युती देणार छप्परफाड धनलाभ, रखडलेली कामं होणार पूर्ण; वैवाहिक जीवनातही नांदणार सुख

SCROLL FOR NEXT