Dona Paula Ophthalmology department started in Manipal Hospital Dainik Gomantak
गोवा

Panaji News : दोनापावला येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेत्ररोग विभाग सुरू

Panaji News : या नेत्ररोग विभागाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी, दोनापावला येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये प्रसाद नेत्रालयातर्फे नेत्ररोग विभागाची सुरवात करण्यात आली आहे. या नेत्ररोग विभागाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी उकेंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलवाहतूकमंत्री श्रीपाद नाईक, मणिपाल हॉस्पिटल गोवाचे संचालक सुरेंद्र प्रसाद आणि प्रसाद नेत्रालय सुपर स्पेशॅलिटी आय हॉस्पिटलचे संचालक डॉ. कृष्ण प्रसाद कुडलू यांच्यासह हॉस्पिटलचे अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रसाद नेत्रालयाबरोबरच्या सहकार्याने नेत्ररोग उपचार सुविधा सुरू करणे म्हणजे गोव्यासाठी अभिमानाची बाब आहे.

कारण डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक सुविधांमध्ये वाढ होऊन गोवा आणि आसपासच्या भागातील रुग्णांना सुविधा उपलब्ध होईल. मला खात्री आहे की प्रसाद नेत्रालय आणि मणिपाल हॉस्पिटल यांच्या मोठ्या प्रमाणावरील कुशलतेमुळे आरोग्य सुविधा या अधिक सक्षम होऊन राज्यातील आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा होऊ शकेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत याप्रसंगी म्हणाले.

श्रीपाद नाईक यांनी सांगितले, की प्रसाद नेत्रालय उडुपीच्या सहकार्याने मणिपाल हॉस्पिटलतर्फे नवीन नेत्ररोग विभागाची स्थापना केल्यामुळे आता डोळ्यांच्या आजाराचे निदान, तपासणी आणि उपचार लवकर होण्याची रुग्णांची सोय झाली आहे.

सुरेंद्र प्रसाद, डॉ. कृष्ण प्रसाद कुडलू यांचीही भाषणे झाली. यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road: 15 दिवसांत, 24 तासांत खड्डे दुरुस्त केले जातील 'या' घोषणांचे काय झाले?

Goa Opinion: सशस्त्र दरोडा, दिवसाढवळ्या मारहाण! सध्या, भिण्याचीच गरज आहे..

Bank Holidays Diwali 2025: दिवाळीला 'महा-वीकेंड', सरकारी सुट्टी कधीपासून कधीपर्यंत? बँका आठवड्यात किती दिवस राहणार बंद?

'तो' शेवटचा चेंडू ठरला आयुष्यातील अंतिम क्षण; हृदयविकाराच्या झटक्याने गोलंदाजाचा मैदानावरच मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

Ranji Trophy: गोवा संघाशी भिडणार IPLचा शतकवीर; पर्वरीत रंगणार सामना; रणजी सामन्यात चंदीगडचे आव्हान

SCROLL FOR NEXT