Dona Paula Jetty  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: दोनापावला जेटीला लागेना मुहूर्त; पर्यटक अजूनही प्रतिक्षेत

दोनापावला येथील व्यापाऱ्यांना जेटी खुली झाल्यास चांगला व्यवसाय मिळू शकतो. याप्रश्‍नी आमदार बाबूश मोन्सेरात यांनीही लक्ष घातले होते. पण जेटी सुरू झाली नाही.

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: सुशोभीकरण केलेली दोनापावला जेटी पर्यटकांसाठी नव्या वर्षातही खुली होईना झाली आहे. त्यामुळे या परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये जेटी बंद ठेवण्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

5 डिसेंबर 2022 या तारखेला दोनापावला जेटी पर्यटकांसाठी खुली होईल, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे व महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पर्यटन खात्यात झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केले होते. त्यानंतर 5 जानेवारी 2023 ही तारीख गेली आणि आता फेब्रुवारी 2023 मधील 5 तारीखही तोंडावर आली आहे.

त्यामुळे ही जेटी नक्की खुली कधी होणार, असा प्रश्‍‍न येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना पडतो. जेटीचे जे काम झालेले आहे, त्याबाबत पर्यटन खात्यातील काहींनी म्हणे प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्यामुळेच त्याला विलंब होत असल्याचे व्यावसायिक सांगतात.

पर्यटनमंत्री खंवटे हे आपला शब्द पाळतात, असे म्हटले जाते. परंतु त्यांनी 5 डिसेंबर ही तारीख सांगूनही त्या तारखेला जेटी का खुली केली नाही, असा सवाल नगरसेवक नेल्सन काब्राल यांनी उपस्थित केला आहे.

येथील व्यापाऱ्यांना जेटी खुली झाल्यास चांगला व्यवसाय मिळू शकतो. याप्रश्‍नी आमदार बाबूश मोन्सेरात यांनीही लक्ष घातले होते. पण जेटी सुरू झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Crime: मुंगुलप्रकरणी नवी अपडेट! हल्ल्यानंतर गँगस्टर वेलीने घेतली 60 लाखांची कार; काणकोणमधील एकजण पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: 'भाजपला पराभूत करण्‍यासाठी गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीला सोबत घेऊन लढू', पाटकरांनी केले युतीचे सूतोवाच

Candolim: मद्यधुंद पर्यटकांचा गोव्यात धुडगूस! कांदोळी बीचवर 10 दुचाक्यांची तोडफोड; बंगळुरूच्या 5 जणांना घेतले ताब्यात

Goa Road Repair: '..येत्‍या 15 दिवसांत रस्‍ते सुधारू'! CM सावंतांचे आश्‍‍वासन; खड्डेमय रस्‍त्‍यांवरून ‘आप’ आक्रमक

Horoscope:नोकरीत सांभाळा,आरोग्याचा विचार करा, प्रेमसंबंधात गोडवा वाढेल; वाचा तुमची रास काय सांगते?

SCROLL FOR NEXT