Domnic Gaonkar AAP Dainik Gomantak
गोवा

डॉमनिक गावकर यांची आप पक्षातून हकालपट्टी

आपचे गोव्याचे प्रदेश अध्यक्ष अमित पालेकर यांनी आज बुधवारी हा आदेश जारी केला.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : भाजप पक्षात जाण्याची इच्छा व्यक्त केलेले आप पक्षाचे कुडतरी मतदारसंघाचे उमेदवार डॉमनिक गावकर यांची आपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. आपचे गोव्याचे प्रदेश अध्यक्ष अमित पालेकर यांनी आज बुधवारी हा आदेश जारी केला. गावकर यांनी पक्षविरोधी कृती केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे

आपचे स्थानिक नेते आणि राय जिल्हा पंचायत सदस्य डॉमनिक गावकर हे आप पक्षाला राम राम करून भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत असून येत्या आठवड्यात ते भाजपात प्रवेश करतील असे सांगितले जाते. यासंदर्भात गावकर याना विचारले असता त्यांनी या वृताला दुजोरा दिला. माझी भाजपच्या नेत्यांशी बोलणी झाली असून मी लवकरच त्या पक्षात प्रवेश करणार असे त्यांनी सांगितले.

2022 मध्ये गावकर यांनी आपच्या उमेदवारीवर कुडतरी मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. आप पक्ष का सोडता असे विचारले असता, मी निवडणुकीला उभा राहिल्यावर आपने मला काही आश्वासने दिली होती. पण ती नंतर पाळली गेली नाहीत. आप तर्फे निवडणूक लढविणे ही माझी चूक होती. माझ्या राजकीय कारकिर्दीवर या निर्णयामुळे बराच वाईट परिणाम झाला असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT