Renuka Da Silva Dainik gomantak
गोवा

सुष्मिता देव त्यांना 'हिरो' मानते काय, कोविड रूग्णांच्या हत्येला जबाबदार कोण

’विलन’ म्हणून संबोधणाऱ्या देव यांच्या वक्तव्यावर टीएमसीचे स्थानिक नेते मौन बाळगतील का?

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या विरोधात टीएमसी नेत्या सुष्मिता देव यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत, या प्रादेशिक पक्षाच्या महिला सदस्यांनी कोविड रूग्णांच्या हत्येसाठी जबाबदार असलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विरोधात ब्र का काढला नाही, ‘सुष्मिता देव त्यांना 'हिरो' मानते काय, असा प्रश्न केला आहे.

गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पक्षाच्या उपाध्यक्ष रेणुका डा सिल्वा यांच्यासह नगरसेविक निमिषा फालेरो आणि माजी नगराध्यक्ष पूजा नाईक यांनी बुधवारी मडगाव येथे पत्रकार परिषद घेवून विजय सरदेसाई यांना ’विलन’ म्हणून संबोधणाऱ्या देव यांच्या वक्तव्यावर टीएमसीचे स्थानिक नेते मौन बाळगतील का असा प्रश्र्न केला.

“किरण कांदोळकर आणि त्यांची पत्नी कविता यांनी गोवा फॉरवर्डचा राजीनामा देऊन टीएमसीमध्ये प्रवेश केला. पण त्यांनी विजय सरदेसाईंविरुद्ध एक शब्दही काढला नाही. देव या राजकीय पर्यटक असून गोव्याच्या अभिमानी सुपुत्राविरुद्ध जे काही बोलल्या ते टीएमसीच्या स्थानिक नेत्यांना मान्य आहे की नाही हे त्यांनी स्पष्ट करावे.’’ असे निमिषा फालेरो यांनी म्हटले.

“टीएमसीने तिला राज्यसभा पदाची ऑफर दिल्यानंतर देव यांनी काँग्रेसचा विश्वासघात केला होता. त्यामुळे विलन कोण हे स्पष्ट झाले आहे.” असे फालेरो म्हणाल्या.

“विजय सरदेसाई यांनी राज्य आणि त्यांच्या मतदारसंघासाठी काय केले आहे हे गोवा (goa) आणि फातोर्डाच्या लोकांना माहीत आहे. आमची क्षमता तपासण्यासाठी आम्हाला कोणत्याही राजकीय पर्यटकांची गरज नाही. ” असे ती म्हणाली.

“गेल्या वेळी जेव्हा देव निवडणुक (Elections) लढली होती तेव्हा आसामच्या विवेकी लोकांनी तिला 82000 मतांच्या जागतिक विक्रमासह नाकारले. त्यामुळे त्यांनी गोव्यातील राजकारणाचा प्रचार करू नये. तिने आधी आसाममध्ये किमान पंच सदस्य म्हणून निवडून आले पाहिजे आणि मगच विजय सरदेसाईबद्दल बोलले पाहिजे.’’ असे रेणुका डा सिल्वा यांनी सांगितले. " घोटाळे करणारे आणि लोकांच्या ऑक्सिजन अभावामुळे झालेल्या मृत्युंना जबाबदार असलेले प्रमोद सावंत तिच्यासाठी विलन का ठरत नाही"असा प्रश्न डा सिल्वा यांनी केला.

“निज गोंयकार हे अभिमानी लोक आहेत. गोव्याच्या राजकारणावरील (Politics) देव यांच्या 7 दिवसांच्या क्रॅश कोर्सने त्यांना सुट्टीवर आलेल्या पक्षाला कसे नाकारतील आणि खर्‍या गोमंतकियांना मत देवून जिंकून आणतील हे कदाचित शिकविले नसणार.’’ असे डा सिल्वा म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT